Best collection of Marathi Ukhane for Male, Marathi Ukhane for Female, Comedy Marathi Ukhane, Marathi Ukhane for Pooja, Marathi Ukhane for Bride and Groom, Dohale Jevan Marathi Ukhane.

Monday, October 12, 2020

२०+ मराठी कविता 【प्रेम, विरह, प्रेरणादायी, विनोदी】

Marathi Kavita on Love, Life, Inspiration, Comedy


शृंगारिक  मराठी कविता 


१. शृंगार

रोजच पाहतो तुझा चेहरा
आज वाटे नवीन काही
शृंगाराची खान तुझी
नजरेचा बाण घायाळ करी
कमरेवरचा हात तुझा
नजर झुकवित किंचित खाली
ओठावरती चमकते लाली
हा शृंगार कुणासाठी
नटली अशी जणू भासते नटी
उतावीळ झाला जीव
तुला भेटण्यासाठी
मधाळ तुझे ओठ
त्यावर ठेवून अलगद बोट
इशारा करशी मज काही
पैंजणांचा नाद मधुर
असा वाजतो तुझ्या पायी
चाल तुझी जणू चालली वाघीण
डुलते मान जशी डुलती नागिन
कुणास मि काय बोलू
नजरा तुझ्यावर हजार आहेत
शृंगाराची नशा तुझ्या
आज प्रत्येकाच्या नजरेत आहे।


२. शरद पौर्णिमा

क्षीरसागरी स्वच्छंद पोहुनि
चंद्र झालाय वेडा
धुंदफुंद नभी घालतो
धवल दुधाचा सडा
बासुंदीचे पाट धरतो
रात्र जागुनि खुळा
नभाच्या अंगणी फुलवि
चांदण्यांचा मळा
दुग्धशर्करा योग होता
उधाण ये प्रीतीला
प्रियासंगे संग रंगता
सुगंध ये रातीला
शब्द शब्द मिटता
भाव झाला मोकळा
शृंगार असा रातीला
कणाकणात झोकला
पाहुनि जगी प्रणयबहार
उधाण येई सागरा
प्रणयधुंद रात सरता
जाग येई पाखरां
शांत वारे, शांत तारे
आकाशही शांत झाले
प्रणयाचा बहर सरूनि
त्रिभुवन सारे क्लांत झाले


३. श्रावणवेढी राधा

कोकिळेची साद ती
श्रावण घेऊन आली ,
आणि आसुसलेली धरणी ती
आज ओलिचिंब झाली
काळ्या काळ्या त्या ढगांच्या साक्षीने
ही हवा फुलांचा गंध ल्याली,
आणि निसर्गाच्या या स्वप्ननगरीत
श्रावनवेडी  राधा प्रेमरंगी न्हाली...


४. रूप

त्याच्या मधाळ शब्दात
ओठांची मोहोळ खुले
तिच्या दीर्घ हास्यात
हृदयात त्याच्या धडधडे
गालावरची खळी पाहून
पोटात खड्डा पडे
पापणीच्या शिंपल्यात
मोती नजरेचा चमके
डोळ्यावरली अलगद बट
वाऱ्यासह हेलकावे
चंद्रापरी देखणे रूप
पाहून रोमरोम शहारे
थिजले तुझ्या रूपात
माझे कटाक्ष चोरटे
लावी वेड जीवा
घायाळ रूप देखणे


५. एक बाप

जो राब राब राबला
पण कधीच नाही थकला
ज्याने थेंब थेंब गाळला
पण कधीच नाही थांबला
जो जीवावर खेळला
पण कधीच ना घाबरला
जो आपल्यांसाठी जगला
पण कधीच ना मोह केला
जो फाटके घालून फिरला
पण मुलास आपल्या सजवला
ज्याने घासातला घास काढला
पण कधी पोटभर नाही जेवला
ज्याने स्वप़्नास आपल्या जाळला
पण कधीच नाही रडला
ज्याने अश्रुंना आपल्या साठवला
पण विदाईला ना रोखू शकला
ज्याने मनाला कठोर केला
पण कधीच ना प्रेम विसरला
जो रात्र रात्र जागला
पण कधीच ना बेभान झोपला
जो घोडा गाडी झाला
तो मुलांचा एक खेळणा झाला
जो मुलांचे अत्याचार सोसला
पण कधीच काही ना बोलला
ज्याने मुलांचा सुख आनंद पाहला
तो एक दिवस निवांत शांत झोपला

 

प्रेरणादायी मराठी कविता / Inspirational Marathi Kavita 


१. मदिरा आख्यान

पाहूनीया बाटली ! सुटे ना मुखा पाणी !
परलोक तो प्राणी ! पक्का जाणावा !!

जया अखंड ध्यास ! पिण्याचीच ती आस !
ऐसा भला माणूस ! विरळा जाणा !!

पितो मना पासून ! पाजतो आग्रहाने !
कधी उसनवारीने ! दोस्तांत प्रिय !!

लुटूनी घरा दारा ! गुत्याला जगवितो !
सकलां विसरतो ! व्यसनी खरा !!

खंगुनीया तो जाता ! पिऊन मदिरा हाला !
म्हणे कामातून गेला ! एक दारूडा !!

वाईटच हे व्यसन ! जावू नये त्या वाटे !
जाताची कर्म फुटे ! वदतो शिवा !!

 

२. श्रावण महफ़िल

श्रावणात माझी मैफिल सजून गेली
पाहता फडाची लावणी दमून गेली
**
गायीले गीत माझे मैफिलीत माझ्या
स्वरांच्यासवे बघ ही रात्र रंगुन गेली
**
स्वातंत्र्य दिन साजरा आज बहात्तरावा
तिरंग्यापुढे आज मान झुकून गेली
**
आठवा आज हो त्या वीर जवानांना
तयांच्या साठी दोन आसवे टपून गेली
**
सरसर पाऊस थोडे बघा उन्ह पडे
आनंदाने कशी धरणी रमून गेली
**
चला गं सयांनो आज नाग पूजायला
सणात कशी बघा फुगडी घुमून गेली
**
नेमेची येतो महिना कसा श्रावणाचा
आनंदाने बघ कशी मने बहरून गेली

 

३. श्रीमंती

वारसा संतांचा, अभंगाचे मळे
शब्दांमृत फळे, सकल जना !

स्पष्ट होण्या भाव, भाषेचा सहारा
शब्द त्यां फुलोरा, रचनात्मक !

शब्दांतुनी येता, भावनांचा मेळा
श्रोते होती गोळा, सुजाण सारे !

गोडवे आम्हासी, माय मराठीचे
कौतुक शब्दांचे, तिन्ही त्रिकाल !

अर्पुनी शब्दधन, रसिकाचे जाती
लाभली श्रीमंती, कुबेरा पेक्षा !

 

४. विना विना

विनासायास विनाप्रयास,
मिळते का काही?
बसल्या जागेवर, आयते आपोआप,
हलते का काही?

विनासाहस विनाधाडस,
मिळते का काही?
बसल्या जागेवर, आयते आपोआप,
वळते का काही?

विनाधडपड विनापडझड,
मिळते का काही?
बसल्या जागेवर, आयते आपोआप,
जळते का काही?

विनाविचार विनाआचार,
मिळते का काही?
बसल्या जागेवर, आयते आपोआप,
रुळते का काही?

विनाध्यास विनाअभ्यास,
मिळते का काही?
बसल्या जागेवर, आयते आपोआप,
कळते का काही?

विनाखटपट विनाझटापट,
मिळते का काही?
बसल्या जागेवर, आयते आपोआप,
टळते का काही?

विनादर्शन विनाआकर्षण,
मिळते का काही?
बसल्या जागेवर, आयते आपोआप,
जुळते का काही?

विनाचळवळ विनाखळबळ,
मिळते का काही?
बसल्या जागेवर, आयते आपोआप,
पळते का काही?

विनाकष्ट विनाउद्दिष्ट,
मिळते का काही?
बसल्या जागेवर, आयते आपोआप,
बळते का काही?
विनाघर्षण विनामर्जन,
मिळते का काही?
बसल्या जागेवर, आयते आपोआप,
दळते का काही?

मिटुनी डोळे झोपुनी निवांत
मिळते का काही?
बसल्या जागेवर, आयते आपोआप,
फळते का काही?

 

५. एक रानी

लाखों जनांची जननी
लाखात एक राणी
महाराणी ताराराणी
महाराणी ताराराणी

लाख उपकार तुझे
आज भोगतो स्वातंत्र्या
तुझ्या एका भरारिने
हरविले परतंत्र्या

नाही केलास विचार
कधी राज्य भोगन्याचा
कानी घूमे तुझ्या फक्त
नाद प्रजा वेदनांचा

किती सोपे होते तुला
धर्मा पाठ दाखविने
एक आहे मी अबला
पळ म्हणून काढ़ने

तुझ्या शीरी शिवबाचा
तेंव्हा नव्हता तो हात
जनमाच्या सोबतीची
हरविली होती साथ

तरी घेतला निर्णय
एकटीने नेतृत्वाचा
फक्त बदल्याचा नव्हे
निश्चय तो बदलाचा

सुरु केलास अध्याय
नारीच्या सहभागाचा
तूझ्या तलवारिने केला
नाश तिच्या अभाग्याचा

घेतले हाति खड्ग
सर्व बंध झुगारूनी
तुझ्या तपाचे ते फळ
माझ्या हातात लेखणी

दिशा दर्शक तो जसा
ध्रुवतारा ,ताराराणी
देवा माझाही बनु दे तसा  धर्म ताराराणी
आणि कर्म ताराराणी

 

हे पण वाचा   :    Happy Diwali Wishes in Marathi

 हे पण वाचा   :   Inspirational Quotes in Marathi


मराठी विनोदी कविता  / Marathi Comedy  Poems 


१. झेब्रयाचा जन्म

एकदा वाघ शिकारीस निघाला
शोधत शोधत शिकार तो कुराणाशी गेला
डौलदार अजस्त्र तो, डोळे शिकारीकडे
गाढवांचा कळप तेथे चरण्यासी आला
हेरली एक बाकदार, सुंदर, नाजूक गाढवीण त्याने
असेल फर्लागभर अंतरावर
घेऊन पावित्रा मारणार उडी
इतक्यात नजरभेट झाली
त्या सुंदर गाढविणीच्या नजरेने केली, शिकाऱ्यावरच कडी
अन शिकारी खुद्द शिकार झाला
तारीख ठरवली गेली लग्नसोहळ्याची
घेतल्या आणाभाका शिकार न करण्याच्या
व यथेच्छ जोड्याने चरण्याच्या
मंगला समयी लग्न लागले
सोहळ्यास सारे जंगल लोटले
सर्व सुखांत ते तृणभक्षक
आता भय नसे कुणाचे
वाघच आपला रक्षक
मंगलाष्टक म्हंटली गेली
कालांतराने गाढवीण व्यायली
दिलं नवीन रुपडं जंगलाला
अय्या नवलच झालं
बछडं आलं कि गधडं आलं
कि अजून काय आलं ओ जन्माला
गाढविणीची कांती आणि वाघाचे पट्टे
उड्या मारुनी घोड्यावानी खिंकाळते
गधडं गुरकावुनि खिंकाळी फोडी
गवत खाउनी लाथा झाडी
गधडं कि बछडं , पण एक नवीनच रुपडं
अहो , गाढवच ते फक्त वाघांचं कातडं
बघता बघता झाला जंगलभर बभ्रा
घटस्फोट घेऊनि नाव ठेवलं " झेब्रा "

 

२. री री री री

बिनपगारी फुलअधिकारी झाले चिकार
रोजगारी बेकारी झाली भिकार
सत्ताधारी कारभारी झाले चुकार
दादागिरी भाईगिरी झाली टुकार
लाचखोरी भ्रष्टाचारी भरला बाजार
शेतकरी कष्टकरी झाले बेजार
रहदारी घुसखोरी देतेय मुकामार
दुनियादारी इमानदारी पेटली वखार
हरामखोरी चोराचोरी नाना विकार
गुलामगिरी चेंगराचेंगरी माजला हाहाकार.

 

३. धोका ये इश्क़ का !

तुम्हारी आखो का काजल और
प्यार का आचाल हमे बरबाद कर गया

बोहोत धोके खाये हमणे इश्क में जानेमन
'तेरी मोहबत का शिकार हो गया

हम ना करते मोहबत तुझसे पर तेरे
भोले पण में बेकरार हो गया

तुझे पेहेचान नें के लिये जानेमान पेहलिबार न
जाणे कैसे धोका खा गया

खुश थे हम हमारी इस दुःख की दुनिया में
पगली किस खुशी में हमे इतना रूला दिया

जखमी हमारे दिल को आज फिर तुने ये
हसीना ऐसा सितम दे दिया

प्यार भरी हमारी जिंदगी में मोहबत का एक
झुटा जहर भर दिया

पी के तेरे इश्क का प्याला ये आशिक बे
वजह हलाल हो गया

'तेरी झुटी हसी पर न जाणे कैसे पागल प्रेमी
आज कुर्बान हो गया

जाते जाते एक बात बोल दु तुम्हे 'तेरी खुशी के लिये
ये इश्क का शेहजादा खुदा को प्यारा हो गया

इश्क में है धोके सब इस बात का सारा जहा
गवा हो गया

 

४. बगल

उचकी लागली आणि जाग आली
पाहिलं न् तु ऑनलाईन दिसली !

झोपलेला होता नवरा तोवर
सासुची तेवढ्यात झोप उडाली !

काय राव झाली भलतीच गोची
बायकोचीपण इथ झोप उघडली !

न आलेलं नळाला पाणी, आणि
उकळत्या दूधावर चर्चा झाली !

विषय काय घ्यावा हो रम्य प्रहरी
म्हणता, चर्चेला त्या बगलच दिली !

 

५. बाई पलंगावर बसून होती

बाई पलंगावर बसून होती
गुलाबराव मस्त मळत होते
मळता मळता बघत होते
बाईकडं गिधाडावानी
बाई टाकत व्हती ऊसाश्यावर उसासे
कधी येतायत गुलाबराव आणि काढतायत एकदाची पिसे
मळता मळता थाप मारली
राळ उडालेली नाकात बसली
शिंकेवरती शिंक आली
शिंकण्यातच सारी रात गेली
आवाजाने गावाला जाग आली
बाई जाम उखडली
वाहून शिव्यांची लाखोली
चरफडत चोरपावलांनी निघून गेली
रात बी गेली अन बाई बी गेली
थापा मारण्यातच वेळ गेली

 

विरह मराठी  कविता / Virah  Marathi  Poem 


१. प्रेमात तुझ्या 

प्रेमात तुझ्या काय काय मी केले
काट्यांचे फुलं करून तुला वाहिले
दुःखापासून वंचित तुला मी ठेवले
प्रत्येक वादळातुन तुला मी सवारले
प्रेमात तुझ्या मला शिव्या मिळाल्या
त्यापण मी आनंदाने गिळल्या
बऱ्याच दुःखद घटना तुजपासून दूर ठेवल्या
आणि आनंदाच्या लाटा तुझ्याकडे वळवल्या
प्रेमात तुझ्या मी खुप सहन केलं
प्रत्येक प्रसंगाला मी तोंड दिलं
जीवनात थोडं हास्य होतं मी सांभाळलं
सारंच्या सारं तुझ्यासाठी खुलं केलं
प्रेमात तुझ्या मी स्वतःपासून दूरावलो
क्षणा क्षणाला तुझ्या पाठीमागे मी राहिलो
तुझ्यासाठी मी वादळाच्या घेरात आलो
तुला आनंदी पाहण्यासाठी मी *जोकरही* झालो
प्रेमात तुझ्या निराशा मला मिळाली
माझी सारी खटपट व्यर्थ गेली
लग्न करुन तू सासरी निघाली
श्वास सोडला मी ,जेंव्हा तुला आनंदी पहिली

 

२. अथंग प्रेम

चाललीस तु सोडुन तर.......
माघ वळुन बघतेस का...?
मी होतो तसा बरा होतो
मला बदललस का...?
प्रेमात घमंडी तु अन्...
मी हताश आज आहे।
तुझ्या नजरेत टायमपास
अन् माझ्यासाठी स्वर्ग आहे।
ते म्हणजे *"अथांग प्रेम"*

 

३. एक दिवस येईलच

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील:
*शीर्षक.एक दिवस येईलच*

नाहीतरी कोण असतं आपलं म्हणायला
एक दिवस येईलच जग हे सोडून जायला

जायचंच आहे तुला तर
एकदा हळव्या मनाला छळून जा
मरण जवळ येईलच आता
रचलेल सरण ही तू जाळून जा

जळणारच आहे आत्मा ती भरकटायला
एक दिवस येईलच जग हे सोडून जायला

मागितलं नव्हतं काहीच तुला
जरासा इरादा होता जपण्याचा
हृदय होते तुझे मंदिर गं
विचार केला होता लपण्याचा

तयार ना झालीस हृदयात मला जपायला
एक दिवस येईलच जग हे सोडून जायला

झटकशील हात माझे
खडतर अंधाऱ्या वाटेवर
काजवे ही आले बघ का
जळलेल्या त्या राखेवर

विरान रात काजव्यांची वेळ ना सरायला
एक दिवस येईलच जग हे सोडून जायला

राख अशीही झाली होती
न पाहिलेल्या रंगीत स्वप्नांची
रंग ही सारे उधळून गेले
किंमत राहिली फक्त रकमांची

सारं संपून गेलं अर्थ राहिला ना जगायला
एक दिवस येईलच जग हे सोडून जायला

सखे असंच असत प्रेम तर
जिव्हाळा तुझा बोचला असता
रक्त रंजित झाली असती धरणी
हृदयी घाव मी तेव्हा सोसला असता

ताकद ना राहिली घाव ते सोसायला
एक दिवस येईलच जग हे सोडून जायला

 

४. वेदना प्रेमाची -  Marathi Kavita 

वेदना प्रेमाची आजही तितकी आहे
तुझाच होतांना आपुलकी जितकी आहे

तुझ्या ही माझ्या ही कधी
जागु दे पुन्हा त्या संवेदना
निस्सीम तुझाच होतांना
जड होतील ही त्या वेदना

हृदयात जपतांना आगही तितकी आहे
तुझाच होतांना आपुलकी जितकी आहे

तुझं पत्रावळी सारख तुडवन
काळजाला घाव देऊन गेलं
नकळत मग समुद्रावर ही
वादळ विरहाचं घेऊन आलं

रातीच्या वादळाला जागही तितकी आहे
तुझाच होतांना आपुलकी जितकी आहे

मेहंदीचा रंग चढत होता
तसा ओढणीचा रंग बदलत होता
तेव्हा धरणी ही काटेरी वाटली
बोहल्यावर चा काटा सलत होता

हृदय जळतांना राख ही तितकी आहे
तुझाच होतांना आपुलकी जितकी आहे

मी ही वाट पाहत होतो
देऊन जाशील तरी सुखाला
विणलेली दोर झालीस तू
अन ताण देऊन गेलीस दुःखाला

गळ्यात दोरीची दाह ही तितकी आहे
तुझाच होतांना आपुलकी जितकी आहे

 

५. आयुष्याच्या वाटेवर  -   Marathi   Kavita   on   Life 

आयुष्याच्या वाटेवर सगळंच काही आलबेल नसतं
आणि म्हणून गेलेला तोल सावरायला कोणीतरी साथ हवं असतं
शब्दाने शब्द वाढवून एकमेकाचं कुठं चुकलं हे पाहायचं नसतं
तर शब्दांच्याही पलीकडल्या मायेच्या उबेत विसावायचं असतं
एकानं फटाक्याची दारू झालं तर दुसऱ्यानं वात व्हायचं नसतं
आणि क्षणिक रागापायी संसाराच्या घटाचा स्फ़ोट करायचं नसतं
आपल्या माणसाचं मन ओळखून त्याच्या उणिवांना समजून घ्यायचं असतं
उणिवांनाहि मागे सारून त्या संसाराच्या घटात छानसं रोपटं लावायचं असतं
ते रोप फोफावायला प्रेमाचं अखंड पाणी घालायचं असतं
आणि त्या रोपावर फुललेल्या कळीला जीवापेक्षाही जास्त जपायचं असतं
कधी प्रखर उन्हात असताना त्या रोपाला मायेच्या सावलीत सारायचं असतं
पण मंद पावसात मात्र त्याला चिंब न्हाऊ घालायचं असतं
हेवे दावे सोडून माणसातल्या मनाला साद घालायचं असतं
कारण त्या  मनात एक प्रेमाचं अतूट नातं विणलेलं असतं
रागाला त्सुनामीच्या लाटेसारखं उंच जाऊ द्यायचं नसतं
आणि अशी लाट आलीच तर काळजाची होडी करून दोघांनी पार जायचं असतं

 

मराठी प्रेम कविता /  Marathi  Prem  Kavita 


१. प्रेम सर्वांनाच नहीं लाभत

प्रेम करणंही नाही हुकत
प्रेमाचा अर्थ ज्यांना नाही सापडत
प्रेम ते पण असतात शोधत
प्रेम करायला नाही कोणी मिळत
प्रेम करण्यासाठी पण फिरावं
लागतं प्रेम मागत ...
प्रेम करून नसते कोणी लाजत
प्रेम घेवून नाही कोणी माजत
प्रेम कर म्हणून सागावं नाही लागत
एका हाताने कधी टाळी नाही वाजत
प्रेम करणारे कायम प्रेमच असतात करत
प्रेम आपल्या..मनातून नाही निघत
एकंदरीत प्रेम कधीच सुट्टी नाही काढत

 

२. खरच मला प्रेम करता येत नाही

ती माजी काळजी घेत राहते, निशब्द होऊन माज्यासाठी जिजत रहाते  |
तिज्या साठी काय करावे हेय काय कळत नाय ||
अन खरंच मला प्रेम करता येत नाय..

कधी कधी ती एकटक बगत राहते, न जाणे काय विचार करत राहते |
तिला त्या विचारातून बाहेर कसे काढावें हे काय कळत नाय ||
अन खरंच मला प्रेम करता येत नाय..

ती सतत काही न काही विषयांवर बोलत राहते |
खरंतर ती मला येईकन्यासाठी बडबडत राहते ||
मी न येईकल्या सारखे करत राहतो ,
तिज्याबर तसंन-तास काय बोलावे हे मला काय कळत नाय ||
खरंच मला प्रेम करता येत नाय..

ती रडतं असताना तिला जवळ घेऊन ,
डोक्यावरून हाथ फिरवत, "काळजी नको करुस मी आहे ना"|
हे बोलण्याचे हि धाडस होत नाय  ||
खरंच मला प्रेम करता येत नाय..

मनात प्रेम असूनहि , मला व्यक्त करता येत नाय,
अगं वेडे तुज्या शिवा माझे हि कोण नाय |
तिला मीटी मारून कुरवळने हे, कृतांत हि मला करता येत नाय ||
खरंच मला प्रेम करता येत नाय..

पूर्वी जन्माचे हे, काय माझे पुण्य नाय ,
परमेश्वर हे तुझेच उपकार आहेत |
माझे हृदय दगडाचे असले तरी त्याला ,
असा निस्वार्थी प्रेमळ पुजारी देणारा तूंच आहेस |

देवा आता एकचं उपकार कर , या दगडाला हि पाजर फुटू दे |
अन मला तिज्या बदल चे प्रेम,  व्यक्त करता येऊ दे |
खरंच मला प्रेम करता येवू दे...खरंच मला प्रेम करता येवू दे ...

 

३. इतकी का सुंदर दिसतेस तू..

मी  विचारल्यावर  हळूच
गालात का  हसतेस  तू
उघड कधीतरी  हे  रहस्य
हि  कसली  जादू  केलीस  तू ...

तुझ्यातच माझं  मन  रमतं
तुझ्या सहवासातच ते हसत
तुझ्या पासन दूर जायला मन  घाबरत
का  समजून  घेत  नाहीस  तू
इतकी  का  सुंदर  दिसतेस  तू ....

मनाच्या एका कोपऱ्यात सजवलंय  ग तुला
माझ्या लेखणी ने कोऱ्या कागदावरती  रंगवतोय तुला
नवीन काही लिहाय घेतलं तर तुझा
हसरा  चेहरा  समोर  येऊन  जातो
इतकी का सुंदर दिसतेस  तू ……….

शब्दांच्या कोड्यांमधून  निघून
तुझ्या स्वप्नांमध्ये  रमून  जातो
इतकी का सुंदर दिसतेस तू ना कळत
तुझ्यातच गुंतून  जातो  मी
इतकी का सुंदर दिसतेस  तू ……….

पावसाच्या  सरीत  भिजताना
खूप  छान  दिसतेस  तू
बागेमधील  फुलांकडे  बगता
नजरेस  पडते  तू
तुझं  रूप  बघून  गुलाबाच्या
फुलाला लाजायला येईल
इतकी  का  सुंदर  दिसतेस  तू ....

डोळे  बंद  करताच  येतेस  समोर  तू
डोळे  बंद  करताच  समोरून  जातेस  तू
येवडंच  तुझं  माझं  नातं नसतानाही
माझ्यासोबत  असतेस  तू ......
इतकी  का  सुंदर  दिसतेस  तू ....

 

४. माझ प्रेम -   Marathi  Kavita  for  Love 

वंसत ऋतू मधल्या पहिल्या पावसाच्या
थेंबा सारखा होत माझं प्रेम,
जो धरतीच्या कूशीत पडताच आपला सुंगध
दरवडणारा आणि मन तृप्त करून जाणारा होता माझं प्रेम...

मंदिरातल्या पुजारि सारखा होता माझं प्रेम,
जो देवाच्या भक्तिमध्ये तल्लीन होऊन त्याचा
भक्ति मध्ये आपला सर्वस्व अर्पण करणारा
होता माझं प्रेम...

गगण आणि समुद्रासारखा होता माझं प्रेम,
जरी एकमेकांपासून दूर असलो तरी समुद्रामध्ये
आपल्या प्रेमाचा निळा रंग सोडून आपल्या प्रेमाची
जाणीव करून देणारा होता माझं प्रेम...

प्रेम म्हंटले कि तिच नाव आणि तिचा नाव म्हंटले
कि माझं प्रेम,
माझ्या प्रेमाची व्याख्याच तिच्या पासून सुरू होऊन
तिच्या मध्येच संपेल असं होता माझं प्रेम...

गुलाबाच्या फूला सारखा होता माझं प्रेम,
दिसण्यास जितका सुंदर मार्ग मात्र तितकाच काटेरी...
म्हणून धर्माचा तो काटा माझ्या प्रेमाच्या फूला पेक्षा
श्रेष्ठ ठरला आणि माझ्या प्रेमाची किंमत कमी करून
जाणारा असं होता माझं प्रेम...

 

५. प्रेमवेडी - Marathi Kavita 

एक होती प्रेमवेडी माझ्यावर
खुप प्रेम करायची
आठवण जरी आली माझी की
दिवसरात्र कवीता करायची
नाही दिसलो मि तीला की
काळजी करत शोधायची
आलो जवळ तिच्या की मग
हळुच लपुन ती लाजायची
रूपाने तिच्या मला
भूरळ तीच पाडायची
स्वप्नाच्या दुनियेत जाऊन
तिचेच स्वप्न दाखवायची
कवी अनिकेत मशिदकर


मित्रांनो  आपल्याला जर ह्या सुंदर मराठी कविता आवडल्या असतील तर आम्हाला नक्कीच Comment Box मध्ये  लिहून  कळवा.  आपल्या  प्रिया व्यक्तिं सोबत ह्या कविता Share करायला विसरू नका. धन्यवाद 
Share:

0 comments:

Post a Comment

Copyright © Marathi Ukhane About Us | Privacy Policy | Disclaimer | Contact Us