Best collection of Marathi Ukhane for Male, Marathi Ukhane for Female, Comedy Marathi Ukhane, Marathi Ukhane for Pooja, Marathi Ukhane for Bride and Groom, Dohale Jevan Marathi Ukhane.

Sunday, August 9, 2020

95+ Marathi Inspirational Quotes, Thoughts & Images

Marathi Inspirational Thoughts, Quotes and Images for Your Daily Inspiration.

आजच्या दुनियेत प्रत्येक माणूस आपले जीवन सुंदर बनवण्या साठी झटत आहे आणि तो त्या साठी परिश्रम सुद्धा  करत आहे परंतु,  माणसाला आपल्या आयुष्यात अनेकदा नैराश्याचे तोंड बघावे लागते. अश्याच नैराश्याच्या काळात आपण खचून जायचे नाही. प्रयत्न करत राहायचे. आपल्याला नक्कीच आपल्या कामात यश मिळेल. त्या साठी आम्ही आपल्या परेण्त सुंदर आणि प्रेरणादाई Inspirational Thoughts in Marathi , Marathi Inspirational Quotes, Inspirational Quotes in Marathi with Images चा एक सुंदर Collection घेऊन आलो आहोत.

Inspirational Thoughts
Inspirational Marathi Quotes


आता आपण म्हणाल कि हे असल वाचून काई होणार आहे. आमचा यश आम्हाला परत मिळणार आहे का ?

अश्याने तुम्हाला तुमचे यश तर नाही मिळू शकत, पण हे सकारात्मक Marathi Inspirational Thoughts वाचून नक्कीच तुमच्या मनात चिकाटी ने संघर्ष करण्याची जिद्द निर्माण होईल आणि आपल्याला असे केल्याने नक्कीच यश मिळेल, आम्हाला याची पूर्ण खात्री आहे.    

Inspirational Thoughts in Marathi 


Inspirational Thoughts in Marathi
Marathi Inspirational Thoughts Images


गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम.

  

कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.

 

देव पूर्ण जगाची काळजी घेवू शकत नाही म्हणून त्याने प्रत्येक घरात आई दिली असावी, त्याचप्रमाणे आई आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागाची काळजी घेवू शकत नाही म्हणून तिने आपल्याला ''बहिण'' दिली असावी

 

रडण्याने भविष्य बदलत नसते.

 

चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका..

 

भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !

 

गड्यांनो ध्यानी ठेवा देवाकडे नाही 'पार्शालिटी'
देण्याचा 'टाईम' चुकेल पण नाही चुकायची 'इक्वॅलिटी'

हे पण वाचा : Good Night Marathi Messages, Images, Status & SMS

हे पण वाचा : Good Morning Marathi Messages (शुभ सकाळ)

श्रद्धेच्या जोरावर असाध्य गोष्टीही साध्य करता येतात.

 

प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.

 

यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !

 

सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

 

वेळ बदलायला वेळ नाही लागत...

 

मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही, हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा
मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं.

 

सर खरचं सांगतोय जगता येईल अस द्या शिक्षण ,बदला फुटकळ अभ्यास

 

तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल...

 

जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की.....तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात..!!

 

स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे...

 

जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.

 

संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.

 

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !

 

प्रेरणादाई मराठी सुविचार 


Inspirational Thoughts in Marathi
Inspirational Thoughts 


गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते

 

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.

 

सत्याने मिळतं तेच टिकतं.

 

असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे. फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे.

 

परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !

 

ह्रदयाची झेप बुद्धीच्या पलिकडची असते... स्वप्न म्हणजे झोपल्यावर बघायची गोष्ट नाही.

 

स्वप्न म्हणजे जे तुम्हाला झोपु देत नाही ते...

 

आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही ।
जिथ आपल्या छत्रपतींच नाव नाही.

 

आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं

 

अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे, तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा. सगळे जग हाच तुमचा देश आहे. त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.

 

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

 

गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !
यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.

 

नदीचे पाणी आटल्यावर पाय न भिजवता नदी पार करु शकू असं म्हणून मुर्खासारखं थांबण्यापेक्षा नदीच्या पात्रात उडी घेऊन, प्रवाह कापून नदी पार करणे शहाणपणाचे असते.

 

किनाऱ्यावर उभे राहून फेसाळणार्या लाटा पाहाव्या, दूर क्षितिजावर पोहोचवणाऱ्या कल्पनेच्या नव्या वाटा पहाव्या...

 

न हरता...न थकता...न थांबता प्रयत्न कारणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं...

 

चांगली वागणूक हा यशोमार्गाचा पहिला टप्पा आहे.

 

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं... पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!!

 

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.

 

ढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर मदत केव्हाही चांगली.

 

उत्तुंग भरारी घेऊ या !

हे पण वाचा : Attitude Status in Marathi - भन्नाट मराठी एटीट्यूड स्टेटस

हे पण वाचा : Marathi Sad Status丨Sad Marathi Status Video

Daily Dose of Marathi Inspirational Quotes

 

Marathi Inspirational Quotes
Marathi Inspirational Thoughts 

चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

 

कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही

 

कोणतेही अडथळे नसलेली, साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही.

 

सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी.. डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावी...

 

दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.

 

चुक ही चुकच असते, कोणी केली याला महत्व नसते.

 

आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.

 

जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान ! कारण त्यांच्यावर निराश हिण्याची पाळीच येत नाही.

 

पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटते.

 

आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे ...त्यांना हळूहळू फुलवत नेलं ना, कि गोष्ट आपोआप तयार होते.

 

आपला हाथ भारी , लाथ भारी... च्या मायला सगळचं लय भारी!

 

स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद.

 

मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.

 

ओठातून उच्चारल्या जाणार्या सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात अधिक श्रेष्ठ !

 

काम करणे हे जर अटळ आहे तर ते काम हसत हसत का करू नये?

 

ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव

 

दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.

 

नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.

 

तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा.

 

उगीच आपण एकट मानतो स्वतःला.. आपल्यासाठी कुठेतरी जगत असत कोणीतरी...

 

Inspirational Quotes in Marathi with Images 


Marathi Inspirational Quotes
 Inspirational Quotes


विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

 

ज्याची कृती सुंदर तो सुंदर !

 

" माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही व देव मला कधीच कमी पडू देत नाही.

 

" क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही.

 

आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत आपल्याला ... जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल !

 

केवळ संपत्ती नव्हे तर उच्च विचारांच्या भक्कम पायांवर यशस्वी माणसांच्या आयुष्याची इमारत उभी असते.

 

जिंकण म्हणजे काय ते हरल्याशिवाय कळत नाही.....

 

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ..

 

आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.

 

लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.

 

बुध्दीपेक्षाही कर्म करताना स्वस्थ मनाची आवश्यकता असते. मनस्वास्थ्य नसेल तर बुध्दी असूनही कर्म नीट होऊ शकत नाही.

 

परीस्थितीने लढायला शिकवल म्हणूनच मी लढतोय उद्याचे सुख बघण्यासाठी दुःखाच्या सावलीत घडतोय...

 

जर कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होउ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे...!!! ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात...!!!

 

उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.

 

मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.

 

"मोडेल पण वाकणार नाही"

 

सुरूवात कुठून करावी,
ह्या विचारात फेसाळत्या, लप-लपणार्या लाटा पायावर घेत बसलेलो आपण…

 

चांगला विचार म्हणजे दिवसाची चांगली सुरुवात...

 

घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये.

 

दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते.


Marathi Inspirational Quotes & Thoughts on Life Challenges

 

Inspirational Quotes in Marathi with Images
Inspirational Quotes in Marathi with Images 

 

माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली, यावरुन मोजता येते.

 

प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.

 

जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही.

 

हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !

 

आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.

 

प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.

 

एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

 

समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे.

 

परमेश्वाराची कृपा होते पण, श्रध्दा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच.

 

प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.

 

काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.

 

चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.

 

फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !

 

रागावून तूमची शक्ती वाया घालवू नका . शहाणपणाने काम करा.

 

रस्ता नाही असे कधीही होत नाही, रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे.

 

खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

 

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !

 

काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वत:ला बदला.


अंतिम शब्द : आम्हाला खात्री आहे कि प्रेरणादाई  Inspirational Thoughts in Marathi , Marathi Inspirational Quotes, Inspirational Quotes in Marathi with Images वाचून नक्कीच आपल्या मनात सकारात्मकता उजागर झाली असेल. आपल्याला हा प्रेरणादायी सुविचारांचा संग्रह नक्कीच आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी सोबत ह्याला Share करण्या पासून थांबू नाकी. आम्हाला नक्की Comment करून सांगा कि आपल्याला कोणत्या सुविचाराने जास्त प्रेरित केले आहे. 

Share:

0 comments:

Post a Comment

Copyright © Marathi Ukhane About Us | Privacy Policy | Disclaimer | Contact Us