Best collection of Marathi Ukhane for Male, Marathi Ukhane for Female, Comedy Marathi Ukhane, Marathi Ukhane for Pooja, Marathi Ukhane for Bride and Groom, Dohale Jevan Marathi Ukhane.

Saturday, February 8, 2020

Dohale Jevan Ukhane in Marathi for Expectant Mother

 Dohale Jevan Ukhane │डोहाळे जेवणासाठी मराठी उखाणे 

Dohale Jevan Ukhane : डोहाळे जेवण हि एक भारतीय संस्कृती मधील अत्यंत पुरातन परंपरा आहे. ह्याला 'Baby Shower', 'गोध भराई'  असे सुद्धा म्हणतात. हि परंपरा नवीन दाम्पत्याच्या आयुष्यात येणाऱ्या बाळाच्या आनंदात साजरी केली जाते. 

dohale jevan ukhane in marathi


डोहाळ जेवणाच्या दिवशी होणाऱ्या आईला झोक्यावर बसवले जाते व तिला फुलांनी सजवले जाते. तिची ओठी सुद्धा भरली जाते. ह्या दिवशी होणाऱ्या आईला आपल्या नवऱ्याचे नाव सर्वान समोर घ्यावे लागते, म्हणजेच तिला Marathi Ukhane घ्यावे लागते. अश्याच डोहाळे जेवणाच्या कार्यक्रम साठी आम्ही Dohale Jevan Ukhane, Baby Shower Ukhane in Marathi घेऊन आलो आहोत.

Marathi Ukhane For Dohale Jevan │Baby Shower Ukhane In Marathi 


पाच सुवासिनींनी भरली 5 फळांनी ओटी;
-------- रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांसाठी.  

मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी;
--------- रावांचे नाव घेते  डोहाळे जेवणाच्या दिवशी. 

काव्य आनि कविता सागर आणि सरिता
.........चे नाव घेते  तुमच्या करिता.
 
सुर्यमा मावळला, चन्द्रमा उगवला,
रजनी टाकते हळुच पाउल,
--- आणि --- च्या संसारात,
लागली बाळराजाची चाहुल.
 
माझ्या सासर - माहेरची , लोकं सारी हौशी;
---------- रावां चं नाव घेते डोहाळाच्या दिवशी.
 
हिमालयावर पडतो बर्फाचा पाऊस;
---------- रावांचे नाव घेते सासरच्यांनी केली हौस. 

मोहरली माझी काया, लागता नवी चाहूल;
---------- रावां चं नाव घेते आता जड झाले पाउल. 

Also Read : Marathi Ukhane for Male
Also Read : Marathi Ukhane for Female

मायेच्या माहेरी डोहाळे-जेवणाचा घाट,
---------- रावां चे नाव घेते, केला थाटमाट.
 
आई-वडील प्रेमळ, तसे सासू-सासरे;
---------- रावां चं नाव घ्यायला डोहाळे जेवणाचं कारण पुरे.
 
तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून डोळे माझे पाणावले;
---------- रावां चं नाव गोड, पुरवा माझे डोहाळे.
 
घाट घातला तुम्ही पुरवायला माझे प्रेमळ डोहाळे ;
---------- रावांच्या प्रेम झुल्यावर घेते मी हिंदोळे.  

पहाटे वेलीवर फुलतात फुले गोमटी;
-------- रावांचे नाव घेते भरली माझी ओटी. 

वसंत ऋतूच्या आगमनाने धरती ल्याली माझी ओटी;
-------- रावांचं नाव घेते डोहाळे जेवण आहे आज. 

कुबेराच्या भांडारात हिरे-माणिकांच्या राशी;
-------- रावांनी आणला शालू डोहाळे जेवणाच्या दिवशी. 

पाच सुवासिनींनी भरली पाच फळांनी ओटी;
-------- रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांसाठी. 

फुटता तांबड पूर्वेला, कानी येते भूपाळी;
-------- रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या वेळी. 

सरस्वतीच्या मंदिरात साहित्यांच्या राशी;
-------- रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी. 

देव्हाऱ्यात देवापाशी मंद ज्योत तेवते;
-------- रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी. 

हिरवी नेसली साडी, हिरवा भरला चुडा;
-------- रावांचं नाव घेऊन शोधते बर्फी किंव्हा पेढा. 

डोहाळे जेवणाला सजवली पाना फुलांची नौका;
-------- रावांचं नाव घेते लक्ष देऊन ऐका. 

थाटामाटाने डोहाळे माहेरच्यांनी केल आज ;
-------- रावांनी मला घातला साज. 

गोप-गोपिकांना करते धुंद कृष्णाची बांसरी;
-------- रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाचे आहे सासरी. 

नाटकात नाटक गाजले सुभद्रा-हरण;
-------- रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाचे कारण. 

कृष्णाच्या गायींना चरायला हिरवे-हिरवे कुरण;
-------- रावांचे नाव घ्यायला डोहाळे जेवणाचे कारण. 

सासू-सासऱ्यांनी डोहाळे जेवण केले माझे झोकात;
-------- रावांचं नाव घेते कार्यक्रम झाला थाटात. 

वाऱ्यावरती हलके हलके कळी उमलली मस्त,
-------- रावांचं नाव घ्यायला कारण लाभल मस्त. 

पांढऱ्या शुभ्र भातावर पिवळ धमक वरण,
-------- रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाचे कारण. 

Also Read : Comedy Marathi Ukhane List for Male & Female
Also Read : Marathi Ukhane for Pooja
Also Read : Funny Marathi Ukhane for Bride & Groom

श्रावणामध्ये येते सुंदर श्रावणधारा;
-------- रावांचे नाव घेते डोहाळे जेवण आहे घरा. 

आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास,
------रावांना भरविते जिलेबिचा घास.

Final Words :  नमस्कार, जर आपल्याला हे Dohale Jevan Ukhane in Marathi , Baby Shower Ukhane in Marathi आवडले असतील तर नक्कीच आपल्या जवळच्या होणाऱ्या मैत्रिणी बरोबर किवनह बहिणी बरोबर share करा. 
Share:

0 comments:

Post a Comment

Copyright © Marathi Ukhane About Us | Privacy Policy | Disclaimer | Contact Us