Best collection of Marathi Ukhane for Male, Marathi Ukhane for Female, Comedy Marathi Ukhane, Marathi Ukhane for Pooja, Marathi Ukhane for Bride and Groom, Dohale Jevan Marathi Ukhane.

Friday, January 3, 2020

130+ Marathi Ukhane For Female | नवरीसाठी मराठी उखाणे

Top List of Marathi Ukhane for Female | नवरी मुली साठी अस्सल मराठी उखाणे 

महाराष्ट्रीयन लग्न पद्धती मध्ये नवरा- नवरी ने उखाणे ( Marathi Ukhane for Female ) घ्याची खूप जुनी पद्धत आहे. लग्नातली हि Ukhane घ्याची परंपरा आज पण चालत आलेली आहे. प्रत्येक नवरा- नवरी ला आपापल्या लग्ना मध्ये मराठी उखाणे / Marathi Ukhane घ्यावेच लागतात. 

marathi ukhane for female
Marathi Ukhane for Female 
आज आम्ही नवरी मुली साठी खास मराठी उखाणे / Marathi Ukhane for Female घेऊन आलो आहोत. नवरी मुली ला उखाणे तयार करत बसण्याची काहीच गरज नाही आहे. नवरी मुली ने ह्या Marathi Ukhane for Female मधील कोणते हि उखाणे लक्ष्यात ठेवावे व आपल्या लग्ना दिवशी नवऱ्या साठी घ्यावे. हे मराठी उखाणे ( Marathi Ukhane for Female ) पाठ करायला देखील खूप सोप्पे आहेत.

marathi ukhane for female
marathi ukhane for female 

Ukhane in Marathi for Female Marriage | नवरीसाठी लग्नात घ्याचे मराठी उखाणे   

दारापुढे काढली, सुंदर रांगोळी फुलांची
__च नाव घेते, सून मी __ची

मोगऱ्याचा सुगंध, पावसाळ्यातील मृदगंध…
__शी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध

आई बाबांनी केले लाड, सासू सासऱ्यांनी पुरवली हौस ...
__च नाव घ्यायला, मला येते फारच मौज

विद्येचा नसावा अभिमान, श्रीमंतीचा नसावा गर्व...
__ रावांच नाव घेते, ऐकताय ना सर्व?

महालक्ष्मी च्या देवळाला, सोन्याचा कळस...
__रावांचे नाव घ्यायला, मला नाही आळस

सूर्याच्या किरणांनी, उगवली पहाट...
__रावांमुळे झाली, सुखकर प्रत्येक वाट

आशीर्वादाची फुले, वेचावीत वाकून...
__रावांचे नाव घेते, तुमचा मान राखून

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात...
__ राव भरले, माझ्या मनात

साजूक तुपात, नाजूक चमचा...
__रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा

मंगळसूत्रातील दोन वाटया, सासर आणि माहेर…
_________रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.

प्रेमाच्या छायेत, आयुष्य घेते विसावा...
__रावांचे नाव घेते, आपला आशीर्वाद असावा

नाजूक अनारसा, साजूक तुपात तळावा ...
__ रावांसारखा पती, जन्मोजन्मी मिळावा

प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी, सौख्य मी विणले...
__रावांच्या साथीने, जीवनपुष्प बहरले

कळी हसली, फूल फुलले, मोहरून आला सुगंध...
__रावांमुळे जीवनात, बहरून आलाय आनंद

यमुनेच्या काठी, ताजमहाल प्रेमाचा...
__रावांचे नाव घेते, मान राखून सर्वांचा

आकाशात शोभतो, इंद्रधनुष्याच्या पट्टा...
__रावांचे नाव घेते, पुरे आता थट्टा

गीतात जसा भाव, फुलांत जसा सुगंध...
__रावांमुळे मिळाला, मला भरभरून आनंद

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने...
__रावांचे नाव घेते, पत्नी या नात्याने

गुलाबाच्या फुलांपेक्षा, नाजूक दिसते शेवंती...
__रावांना मिळो दीर्घायुष्य, हीच देवाला विनंती

चांदीच्या किचन मध्ये, सोन्याचा ओटा...
__सोबत असताना, नाही आनंदाला तोटा

स्वप्नातला राजकुमार, आला घोड्यावर बसून...
__रावांचे नाव घेते, त्यांच्याच बाजूला बसून

 Romantic Marathi Ukhane for Female 


जंगलात जंगल, ताडोबाचं जंगल...
__रावांच्या संसारात, सर्व राहो कुशल-मंगल

देवळावर चढवला, कळस सोन्याचा...
__राव म्हणजे, नवरा माझा नवसाचा

मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार...
__रावांच्या रूपात भेटला, मला उत्तम जोडीदार

सौख्याच्या वाऱ्यासंगे, आनंद मेघ आले...
__रावांच्या संसारात, मी अमृतात न्हाले

विठ्ठलाच्या च्या दर्शनाला लागतात, लांबच लांब रांगा...
_________रावांचे नाव घ्यायला, मला कधीही सांगा...

ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,
… रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल.

कण्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर,
… रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर,

शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकुन,
… रावांचे नांव घेते, सर्वांचा मान राखुन,

लावित होते कुंकु, त्यात पडला मोती,
…रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती,

“दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,
…चे नाव घेते तुमच्या साठी!”

नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद,
…रावांचे नाव घेते दया सत्यनारायणाचा प्रसाद!

पार्वती ने पन केला महादेवालाच वरीन,
…रावांच्या साथीन, आदर्श संसार करीन.

गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी,
…रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.

मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर,
…रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.

आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हा विष्णु आणि महेश,
…रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश.

प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतिची वात,
…रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात.

नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी,
…रावां सोबत आली मी सासरी.

गुलाबाच्या झाडाला फूल येतात दाट,
…रावांचे नाव घेते सोड़ा माझी वाट.

शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी,
........ रावांच नाव घेते तांदूळ घेऊन हाथी.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
....… रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने.

राज हंस पक्षी शोभा देतो वनाला,
… रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला,

लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा,
… रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा.

सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान,
… रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान.

पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,
… रावांच्या नावाने घालते मंगल सुत्रांचा हार.

आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे,
… राव हेच माझे अलंकार खरे.

पूजेच्या साहीत्यात, उदबत्तीचा पुडा,
… रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा.

अभिमान नाही संपत्तीचा, सर्व नाही रुपाचा,
… रावाना घास घालते वरण-भात-तुपाचा,

यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली,
… रावांची जन्मदाती, धन्य ती माऊली,

श्री विष्णुचा मस्तकावर सदैव असतो शेष,
… रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश.

मंदिरात वाहाते, फुल आणि पान,
… रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान.

छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन,
… रावांचे नांव घेते, ऐका सारे जण.

गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशा,
.. रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवसी.

marathi ukhane for female
marathi ukhane for female  


माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने,
.. रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे.

कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा,
… रावांचे नांव घेते, सारे जण बसा.

रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा,
… रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.

खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
… रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.

पतीव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते,
… रावांचे नांव घेतांना, आशीर्वाद मागते.

अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस,
… रावांच नांव घेतांना, कसला आला आळस.

संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,
… रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला,

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
… रावांच नाव घेते निट लक्ष ठेवा.

कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती,
…रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती.

 Unique List of Romantic Marathi Ukhane for Female 


सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात,
… रावांचे नांव घेते, …च्या घरात.

मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती,
...… रावांचे नांव घेऊन करने इच्छापूर्ती.

डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,
.. रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.

अंगणात होती मेथी, पाणी घालु किती,
… रावांच्या हातात सत्यनारायनाची पोथी.

हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी.
… रावांचे नांव घेते… च्या दिवशी.

वेळेचे काळचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस,
…रावांचे नांव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस,

शरदाचे संपले अस्तीत्व, वसंताची लागली चाहूल,
…रावांच्या संसारात टाकते पहीले पाऊल.

गृह कामाचे शिक्षण देते माता,
…रावांचे नांव घेते तुमच्या आग्रहाकरीता.

दीन दुबळ्यांचे गाहाने परमेश्वरानी ऐकावे,
… रावा सारखे पत्ती मिळाले आणखी काय मागावे.

केसात माळते रोज, मी गुलाबाचे फुल,
… राव माफ करतात माझी प्रत्येक भुल.

तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेल ही शिंपडले,
…रावांचे मन, मी केव्हाच जिंकले.

पोर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल,
…रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल.

Also Read : Marathi Ukhane for Male

…रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा,
त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा.

स्वातंत्र्याच्या होमकुंडात विरांनी घेतली उडी,
…रावाच्या नावाने घालते गळ्यात मंगळ सुत्राची जोडी.

नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे,
…रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे.

चंदेरी सागरात, रुपेरी लाटा,
… रांवाच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.

पषातील धुंद वारा छेडीतो, माझ्या अंगाला,
… रावांचे नांव घेते सुर्यनारायनाच्या साझीला.

चंद्राचा झाला उद्य अन् समुद्राला आली भरती,
…रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती.

नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार,
… रावांचा स्वभाव आहे फारच उदार.

करवंदाची साल चंदनाचे खोड,
… रावांचे बोलने अमृतापेक्षा गोड.

सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले,
… रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले.

वसंतातली डाळ पन्ह, देती थंडावा
…रावांसह मला आपला आशीर्वाद हवा.

मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले,
… रावांचे हेच रुप मला फार आवडले,

आज सारे सुख माझ्या दारी दाटले,
…रावांचा प्रेम अजुन तरी नाही आटले.

मला गुणवान पती मिळाले, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा,
…राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा.

सासरी आहे माझ्या सुंदर हिरवा मळा,
…रावामुळेच लागला मला त्याचा लळा.

शिक्षणाने विकसीत होते, संस्कारीत जीवन,
…रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन.

इंद्र धनुष्यात असतात सप्तरंग,
…रावांच्या संसारात मी आहे हंग.

निळ्या नभात चंद्राचा प्रकाश,
…रावांवर आहे माझा विश्वास.

प्रेमाचे कच्चे धागे खेचती मागे पुढे,
…रावांच्या साथी साठी माहेर सोडावे लागे.

प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची,
…रावांच्या साथीने सुरवात करते सहजीवनाची.

मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध…
___ सोबत मला मिळाला, जीवनाचा आनंद !

दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या गाठी…
__ रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी

सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही …
__ रावांचे नाव हळूच ओठी येई

सोन्याची अंगठी चांदीचं पैंजण…
__ रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण

चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा …
___रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा

संसाराच्या सागरात प्रेमाची होडी...
__रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी

आग्रहाखातर नाव घेते, आशीर्वाद द्यावा,
____ रावांचा सहवास आयुष्यभर लाभावा.

हिरव्या हिरव्या साडीचा पिवळा काठ जरतारी…
__ रावांचे नाव घेताच येई चेहऱ्यावर तरतरी

पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी…
__मुळे आली माझ्या आयुष्याला गोडी

आतून मऊ पण बाहेर काटेरी साल
___दिसले खडूस तरी, मन मात्र विशाल

सासरची छाया, माहेरची माया...
__आहेत, माझे सर्व हट्ट पुरवाया

आई ने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम...
__सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम

हिरवा शालू लेवुनि येतो श्रावण महिना,
.... हाच माझा खरा दगिना.

जाईच्या वेलीला आलाय बहार,
..... ना घातला २७ फेब्रुवारीला माझ्या गळ्यात हार.

सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले.....रावाचे नाव घेउन मी सौभाग्यवति झाले.

भाग्याचे कुन्कु प्रेमाचा आहेर ,
.........रावांच्या मिठित विसरते मी माहेर.

काव्य आनि कविता सागर आणि सरिता
..........चे नाव घेते तुमच्या करिता.

हिमालाय पर्वतावरा बर्फाच्या राशी,
........चे नाव घेते लग्नाच्या दिवशी.

 New & Latest Marathi Ukhane for Female for Wedding Ceremony 


नागपंचमीला घरोघरी होते पुरणपोऴी,
.....नी आणली माझ्याकरिता कटकीची चोऴी.

अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड,
........ हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्.

गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर,
............. च्या हातात हात देउन झाले मी निर्भर..

हंसराज पक्षी आकाशात दिसतात हौशी,
.....रावाचे नव घेते सत्यनारायनाच्या दिवशी.

साँजवात लावताना येते माहेरची आठवण ,
..........रावांसाठी झाली सासरी पाठवण.

वसंत ऋतुत कोकीळा गाती गोड,
.....गेले गावाला तर त्यांच्या येण्याची लागते ओढ.

सखोल विचार आणि कठीण परीश्रमाला असावी प्रामाणिकपणाची जोड,
...........चे बोलणे आहे साखरेपेक्षा गोड.

सौभाग्य काक्षिणीने डोक्यात माळावा गजरा,
..... चे नाव घेते आज आहे दसरा.

पनिपुरि खाताना लागतो जोरदार ठसका,
...... ला आवडते बिस्कित ब्रितानिया मस्का - चस्का.

नान्दा सौख्य्भरे दिला सगल्यानि आशिरवाद्,
.....चे नाव घेते द्या सत्यनारायनाचा प्रसाद्.

पुण्यात औन्ध मधे बन्गला उभा आहे ऐटित ,
जळू नका लोकहो माझे ........ राव आहे आय़् टीत.

आम कि डाली पर गाये कोयलिया,
.........के संग बिते सारी उमरिया.

संतांच्या वाणीत आहे सोनियांच्या (ज्ञानाच्या) खाणी,
.... ......आहेत माझे कुंकूवाचे धनी.

हरतालिकेला सुहासिनी करतात महादेवाची पुजा,
..... च्या सहवासात खरी माझी मजा.

संकेताच्या मीलनाकरीता नयन माझे आतुरले,
...........ची मी आज सौभाग्यवती झाले.

राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याच,
..... च नाव घेते अशिर्वाद द्यावा सौभाग्याचा.

कपाळावर लावले कूंकू लाल लाल,
....... च्या जीवावर आहे मालीमाल.

Also Read : Comedy Marathi Ukhane for Male & Female

आशा करत आहोत कि आपल्याला हे marathi ukhane for female ( नवरी मुलींसाठी उखाणे ) आवडले असतील. आपण हे marathi ukhane आपल्या मैत्रिणी बरोबर किंवा बहिणी बरोबर पण Share करू शकता. 

Share:

0 comments:

Post a Comment

Copyright © Marathi Ukhane About Us | Privacy Policy | Disclaimer | Contact Us