Best collection of Marathi Ukhane for Male, Marathi Ukhane for Female, Comedy Marathi Ukhane, Marathi Ukhane for Pooja, Marathi Ukhane for Bride and Groom, Dohale Jevan Marathi Ukhane.

Saturday, 8 February 2020

Dohale Jevan Ukhane in Marathi for Expectant Mother

 Dohale Jevan Ukhane │डोहाळे जेवणासाठी मराठी उखाणे 

Dohale Jevan Ukhane : डोहाळे जेवण हि एक भारतीय संस्कृती मधील अत्यंत पुरातन परंपरा आहे. ह्याला 'Baby Shower', 'गोध भराई'  असे सुद्धा म्हणतात. हि परंपरा नवीन दाम्पत्याच्या आयुष्यात येणाऱ्या बाळाच्या आनंदात साजरी केली जाते. 

dohale jevan ukhane in marathi


डोहाळ जेवणाच्या दिवशी होणाऱ्या आईला झोक्यावर बसवले जाते व तिला फुलांनी सजवले जाते. तिची ओठी सुद्धा भरली जाते. ह्या दिवशी होणाऱ्या आईला आपल्या नवऱ्याचे नाव सर्वान समोर घ्यावे लागते, म्हणजेच तिला Marathi Ukhane घ्यावे लागते. अश्याच डोहाळे जेवणाच्या कार्यक्रम साठी आम्ही Dohale Jevan Ukhane, Baby Shower Ukhane in Marathi घेऊन आलो आहोत.

Marathi Ukhane For Dohale Jevan │Baby Shower Ukhane In Marathi 


पाच सुवासिनींनी भरली 5 फळांनी ओटी;
-------- रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांसाठी.  

मावळला सूर्य चंद्र उगवला आकाशी;
--------- रावांचे नाव घेते  डोहाळे जेवणाच्या दिवशी. 

काव्य आनि कविता सागर आणि सरिता
.........चे नाव घेते  तुमच्या करिता.
 
सुर्यमा मावळला, चन्द्रमा उगवला,
रजनी टाकते हळुच पाउल,
--- आणि --- च्या संसारात,
लागली बाळराजाची चाहुल.
 
माझ्या सासर - माहेरची , लोकं सारी हौशी;
---------- रावां चं नाव घेते डोहाळाच्या दिवशी.
 
हिमालयावर पडतो बर्फाचा पाऊस;
---------- रावांचे नाव घेते सासरच्यांनी केली हौस. 

मोहरली माझी काया, लागता नवी चाहूल;
---------- रावां चं नाव घेते आता जड झाले पाउल. 

Also Read : Marathi Ukhane for Male
Also Read : Marathi Ukhane for Female

मायेच्या माहेरी डोहाळे-जेवणाचा घाट,
---------- रावां चे नाव घेते, केला थाटमाट.
 
आई-वडील प्रेमळ, तसे सासू-सासरे;
---------- रावां चं नाव घ्यायला डोहाळे जेवणाचं कारण पुरे.
 
तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून डोळे माझे पाणावले;
---------- रावां चं नाव गोड, पुरवा माझे डोहाळे.
 
घाट घातला तुम्ही पुरवायला माझे प्रेमळ डोहाळे ;
---------- रावांच्या प्रेम झुल्यावर घेते मी हिंदोळे.  

पहाटे वेलीवर फुलतात फुले गोमटी;
-------- रावांचे नाव घेते भरली माझी ओटी. 

वसंत ऋतूच्या आगमनाने धरती ल्याली माझी ओटी;
-------- रावांचं नाव घेते डोहाळे जेवण आहे आज. 

कुबेराच्या भांडारात हिरे-माणिकांच्या राशी;
-------- रावांनी आणला शालू डोहाळे जेवणाच्या दिवशी. 

पाच सुवासिनींनी भरली पाच फळांनी ओटी;
-------- रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांसाठी. 

फुटता तांबड पूर्वेला, कानी येते भूपाळी;
-------- रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या वेळी. 

सरस्वतीच्या मंदिरात साहित्यांच्या राशी;
-------- रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी. 

देव्हाऱ्यात देवापाशी मंद ज्योत तेवते;
-------- रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी. 

हिरवी नेसली साडी, हिरवा भरला चुडा;
-------- रावांचं नाव घेऊन शोधते बर्फी किंव्हा पेढा. 

डोहाळे जेवणाला सजवली पाना फुलांची नौका;
-------- रावांचं नाव घेते लक्ष देऊन ऐका. 

थाटामाटाने डोहाळे माहेरच्यांनी केल आज ;
-------- रावांनी मला घातला साज. 

गोप-गोपिकांना करते धुंद कृष्णाची बांसरी;
-------- रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाचे आहे सासरी. 

नाटकात नाटक गाजले सुभद्रा-हरण;
-------- रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाचे कारण. 

कृष्णाच्या गायींना चरायला हिरवे-हिरवे कुरण;
-------- रावांचे नाव घ्यायला डोहाळे जेवणाचे कारण. 

सासू-सासऱ्यांनी डोहाळे जेवण केले माझे झोकात;
-------- रावांचं नाव घेते कार्यक्रम झाला थाटात. 

वाऱ्यावरती हलके हलके कळी उमलली मस्त,
-------- रावांचं नाव घ्यायला कारण लाभल मस्त. 

पांढऱ्या शुभ्र भातावर पिवळ धमक वरण,
-------- रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाचे कारण. 

Also Read : Comedy Marathi Ukhane List for Male & Female
Also Read : Marathi Ukhane for Pooja
Also Read : Funny Marathi Ukhane for Bride & Groom

श्रावणामध्ये येते सुंदर श्रावणधारा;
-------- रावांचे नाव घेते डोहाळे जेवण आहे घरा. 

आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास,
------रावांना भरविते जिलेबिचा घास.

Final Words :  नमस्कार, जर आपल्याला हे Dohale Jevan Ukhane in Marathi , Baby Shower Ukhane in Marathi आवडले असतील तर नक्कीच आपल्या जवळच्या होणाऱ्या मैत्रिणी बरोबर किवनह बहिणी बरोबर share करा. 
Share:

Sunday, 26 January 2020

[Top] Funny Marathi Ukhane For Bride & Groom- Marathi Ukhane

Latest Collection of Funny Marathi Ukhane for Male & Female│विनोदी व चावट मराठी उखाणे 

Funny Marathi Ukhane : महाराष्ट्रीयन लग्न पद्धती मध्ये उखाणे घ्याची जुनी परंपरा आहे. लग्नात नवरदेव व नवरीमुली ला उखाणे घ्यावं लागत. पण नेमक असा होता कि आपल्याला उखाणा आठवत याच नाही. म्हणूं आम्ही तुमच्या साठी ह्या लेखना च्या माध्यमातून चावट व विनोदी मराठी उखाणे / Funny Marathi Ukhane घेऊन आलो आहोत.

funny marathi ukhane
Funny Marathi Ukhane For Female / Bride 

आपण ह्यातील एखादा भन्नाट मराठी उखाणा लक्षात ठेवायचा आणि आपल्या लग्नात म्हणायचं आणि सर्व वर्हाड्यांना हसायला भाग पडायचा.

Marathi Funny Ukhane For Wedding Ceremony / लग्नासाठी चावट व विनोदी मराठी उखाणे

गरम गरम तव्यावर रव्याचा पोळा,
...... रावांचा शेजारणीवर डोळा.

रेशमाच्या सदरा त्याला प्लास्टिक चे बक्कळ,
...... राव एवढे handsome पण डोक्यावर टक्कल.

पितळेच्या ताटात ठेवले होते गहू,
लग्नच नाही झाले माझे तर नाव कसे घेऊ.

चंदेरी चोळी ला सोनेरी बटण,
...... रावांना आवडते बटर चिकन.

ताटात ठेवले बेसन चे लाडू,
...... रावांचा नाव घेते किष्यातला मावा नाका कडू.

चांदीच्या ताटात खव्याचा पेढा,
आमचे ...... राव मंझें माजलेला रेडा.

अत्तराची बाटली कचकन फुटली,
...... रावांचं नाव घ्यायला लाच नाही वाटली.

समुद्राच्या काठावर मऊ-मऊ वाळू,
...... राव दिसतात साधे पण आतून आहेत चालू.
ओरेकल असो किंव्हा असो कुठलाही डाटाबेस
सगळेच हॅन्डल करतात -------- रावांची वेगळीच केस

यु.एस मधील कंपनीत असा झाला बोलबाला,
पहिल्याच ट्रायलला ------- रावांचा प्रोग्राम पूर्ण झाला

सॉफ्टवेअर हार्डवेअर शिवाय कॉम्पुटर होत नाही,
------ रावांशिवाय कशात इनट्रेस्ट लागत नाही

कॉम्पुटर असते फ्लॉपी डिस्क
------हिच्याशी लग्न करून मी घेतलीये मोठी रिस्क

पहिली सोनी, दुसरी मोनी, तिसरी जानी
सोडल्या तिघीजणी नी झालो ....चा धनी

y=mx+c हे गणितातील स्ट्रेट लाईन चे इक्वेशन
----- रावांच्या आगमनाने वाढले माझे इव्याल्यूएशन ( evaluation)

आला आला उन्हाळा। संगे घामाचा ह्या धारा …
..... रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा

च्या लॅपटॉपला Dell ची बॅटरी
..... ला लागली ५०००० ची लॉटरी

खोक्यात खोका टिव्ही चा खोका,
गप्प बसा नाहीतर देईन ठोसा

बदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू किसुन,
***** रावं बिड्या पितात संडासात बसून
MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा…
लग्नच माझे ठरले नाही तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा…!

***रांवाची थोरवी मी सांगत नाही
कितीही प्याले रिचवले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!

पावाबरोबर खाल्ले अमुल बटर…
***चे नाव घ्यायला कुठे अडलय माझ खेटर

अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे खुप मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ

 आंब्यात आंबा हापुस आंबा अन,
आमची **** म्हणजे जगदंबा

साखरेचे पोते सुई ने ऊसवले,
**** ने मला पावडर लाऊन फसवले

टेनिसच्या मैदानात आहे माझा FOUR HAND
टेनिसच्या मैदानात आहे माझा FOUR HAND
शोएबच नाव घेते , नवरा माझा SECOND HAND.

यशोमती मैया से बोले नंदलाला
*** च नाव घेतो, लाईफ झिंगालाला

एका हातात पर्स, दुसऱ्या हातात रुमाल
जेंव्हा आहेत  ****राव, मग कशाला हवा हमाल

इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर ,
श्याम रावांचे नाव घेते राम रावांची लव्हर.

रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल,
***** राव एवढे हॅडसम पण डोक्यावर टक्कल

निळे निळे डोंगर आणि हिरवे हिरवे रान,
........रावांचा आवडता छन्द म्हणजे सतत मदिरापान.

 चांदीचा पात सोन्याचे ठसे,
........राव बसले आंघोळीला सोन्यावाणी दिसे

विटावर विटा सात विटा,
........ रावांनच नाव घेते सगळी आता फुटा.
Related :  Marathi Ukhane for Pooja Ceremony 
Final Words : आम्हाला खात्री आहे कि आपल्याला हे विनोदी उखाणे ( Funny Marathi Ukhane) नक्की आवडले असतील. जर तास असेल तर आपण हे marathi funny ukhane आपल्या मित्रानं बरोबर नक्की Share करा.   
Share:

Friday, 17 January 2020

125+ Marathi Ukhane For Pooja For Male & Female

Marathi Ukhane For Pooja For Bride & Groom│कोणतेही सण, शुभकार्य व पूजेसाठी मराठी उखाणे. 

लग्नानंतर नवरदेव व नवरी मुली ला अनेक ठिकाणी देवदर्शनासाठी जेवावे लागते. घरामध्ये अनेक पूजा विधी होतात आणि अश्या पूजेच्या दिवशी नवरदेव व नावरी मुलीला मराठी उखाणे / Marathi Ukhane घ्यावे लागते. आम्ही तुमच्या साठी अश्याच पूजे साठी चे मराठी उखाणे / Marathi Ukhane For Pooja, Marathi Ukhane For Satyanarayan Pooja घेऊन आलो आहोत. आपण ह्या मराठी उखाण्या (Marathi Ukhane For Pooja) मधील कुठला हि साधा सोप्पं उखाणा पाठ करू शकता व अश्याच पूजे दिवशी म्हणू शकता.


माझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा.
... नी त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषा.

अधिकमासात आईने दिली चांदिची परात,
सखींनो २७ फेब्रुवारीला .... ची आली होती हत्तीवरुन वरात.

नारऴीपौर्णिमेला करतात नारऴीभात,
...सह फेरे खाल्ले सात...

.........च्या पूजेला जाई-जुईच्या राशी,
...च नाव घेत हळदी-कुकवाच्या दिवशी.

हंसराज पंक्षी दिसतात हौशी,
---रावाचे नव घेते सत्यनारायनाच्या दिवशी.

सौभाग्य काक्षिणीने डोक्यात माळावा गजरा,
..... चे नाव घेते आज आहे दसरा.

काचेच्या बशित बदामचा हलवा
.......रावाचे नाव घेते सासुबाईंना बोलवा.

माहेश्वरी समाजात ऋषिपंचमीला बहिण भावाला राखी बांधुन करते भावाची आरती,
..... ची आहे माझ्यावर खरीखुरी प्रिती.

कपात दुध दुधावर साय
------ च नाव घेते ----ची माय

मंथरेमूळे घडले रामायण,
..... चे नाव घेते आज आहे सत्यनारायण

पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ' मोरुची मावशी ' ,
........ चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.

जेजुरीचा खन्डोबा तुळ्जापुरची भवानी
....रावाची आहे मी अर्धागीनी

उखाणा घेउन भगिनिंच्या सुप्तगुणांना मिळतो वाव,
आज आहे मंगळागॉरी ..... चे घेते मी नाव.

वारुळाला जाऊन मी नागाची पुजा करते,
..... चे नाव घेऊन सौभाग्याचे आशिर्वाद मागते

हरतालिकेला सुहासिनी करतात महादेवाची पुजा,
..... च्या सहवासात खरी माझी मजा

जीवाभावाची ओवी आळवीन संसाराच्या प्रातःकाली,
....च्या नावावर ठरले मी आज भाग्यशाली

राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा
... च नाव घेते अशिर्वाद द्यावा सौभाग्याचा

अत्रावळीवर पत्रावळि, पत्रावळिवर भात, भातावर वरण, वरणवर तुप, तुपसारखे रुप, रुपसारखा जोडा.....
,.....चे नाव घेते वाट माझी सोडा

धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,
..... च्या जीवावर करते मी मजा.

धरतीताईने आकाशाला राखी बांधुनी जोडीले बंधुत्वाचे नाते,
..... च्या सोबत मी अमरप्रेमगीत गाते

पुण्यकर्म केले असता राहतात जन्मोजन्मीच्या गाठी,
... चे नाव घेऊन जाते मी ग़ौरीहर पुजनासाठी 

नवरातत्रीनंतर येतोय दसरा,
.....चा चेहरा नेहमी असतो हसरा.

 Related Article : Comedy Marathi Ukhane 

भाद्रपद महिन्यात गोकुळ अष्टमीला पाळणा हलला श्रीकृष्णाचा,
..... चे नाव घेऊन निरोप घेते माहेरचा.

हिरव्या हिरव्या मेंदिचा रंग चढलाय लाल लाल,
आज आहे धुलिवंदन .... उडवतात रंग नि गुलाल.

चान्दीच्या तबकात तुपाच्या फूलवाती
...रावाच नाव घेते ...च्या राती

अंतरिचे गीत उमटले,शतजन्मीचे नाते जुळले,
.... सह अंतरी प्रितीचे फुल फुलले (उमलले).

काव्य आनि कविता सागर आणि सरिता
...चे नाव घेते तुमच्या करिता

आज आहे श्रावणी पोळा,
..... च्या जीवावर शृंगार केले सोळा.

Marathi Ukhane For Satyanarayan Pooja   

अर्धनारी नटेश्वराच्या मुर्तीप्रमाणे पति पत्नीच्या
एकरुपतेने बनत असतो संसार,
..... चे नाव घेते आज आहे श्रावणी सोमवार.

मुंबापुरची मुंबादेवी आज मल पावली
श्रीखंडाचा घास देताना .... मला चावली.

भाऊबहिणीच्या प्रेमाचे प्रतिक आहे रक्षाबंधन,
....ना करीते मी रोजच वंदन.

लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा,
.... च्या जीवावर कर्ते मी मजा.

अंबाबाई च्या देवळात हळदी कुंकुवाच्या राशी
स्वानंद रावांचा नाव घेते मंगळागौरी च्या दिवशी

साँजवात लावताना येते माहेरची आठवण
--- रावांसाठी झाली सासरी पाठवण.

हरतालिकेनंतर येते गणेशचतुर्थी,
..... आहेत फार निस्वार्थी

मंगळसुत्राच्या दोन वाट्या, एक माहेरची एक सासरची खूण,
...ची अर्धांगिनी जाहले, भाग्य कुठले याहुन.

कुंकु लावत ठसठशीत, ह्ळ्द लावते किंचित,
..... आहेत माझे पूर्व संचित

वाल्मिकी ऋषीने रचले रामायण,
..... चे नाव घेते आज आहे सत्यनारायण.

सौभाग्यकांक्षिणी करतात गौरईची पुजा,
..... चे नाव घेऊन घेते मी रजा.

श्रीक़ष्णाने लिहिली भगवतगीता
......माझे राम तर मी त्यांची सीता

अश्वीन प्रतिपदेला देवीचे बसता घट,
..... नी आमलाय माझ्याकरिता सोंगतट्यांचा पट.

जन्म दिला मातेने,पालन केले पित्याने
---- चे नाव घेते पत्नि या नात्याने.

नयनाच्या आकाशात उमलते शुक्राची चांदणी
तुमच्याच आशीर्वादाने बाग फुलवित ...... च्या अंगणी

Also Read : Marathi ukhane for Female

Beautiful Marathi Ukhane For Satyanarayan Pooja For Husband & Wife.

श्रावण महिन्यात वाजतगाजत येतात गौरी गणपती,
....चे नाव घेते ते आहेत माझे प्रेमऴपती.

हुमायुनला राखी देउन कर्मावतीची भारतीय इतिहासात अमर झाली बंधुप्रिती,
हैदरभाईंना राखी बांधुनी ..... ची व माझी सफल झाली जीवन ज्योती.

जागतिक शांतिचे प्रतिक आहे कबुतर,
.... च्या सह शांतीने संसार करण्या पुजिते मी गॉरीहर.

नागपंचमीला घरोघरी होते पुरणपोऴी,
.....नी आणली माझ्याकरिता कटकीची चोऴी

श्रावणात आकाशात, कडकडतात विजा...
__रावांसोबत करते, __ची पूजा

श्रावणाच्या आगमनाने, बहरली कांती...
__रावांच्या संसारात, मिळो सुखशांती भर श्रावणात,

पाऊस आला जोरात...
__रावांचे नाव घेते, __च्या घरात

श्रावणात बरसल्या, धुंद जलधारा...
__रावांमुळे फुलला, संसाराचा फुलोरा

श्रावणात येई, पावसाला जोर...
__राव भेटायला लागते, भाग्य खूपच थोर

श्रावणात बरसतात, सरींवर सरी…
__ रावांचे नाव घेते __ ही बावरी

फुलांइतकीच मोहक दिसते, गुलाबाची कळी...
__ रावांचे नाव घेते, __च्या वेळी

हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी...
__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी

__च्या __ला, आली खूपच धमाल...
__रावांच्या कल्पकतेची, आहे सगळी कमाल

भरजरी साडी, जरतारी खण...
__रावांचे नाव घेते, आहे__चा सण

हातात घातल्या बांगडया, गळ्यात घातली ठुशी...
__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी

__च्या दिवशी, दारावर बांधले तोरण...
__रावांचे नाव घ्यायला, कशाला हवे कारण?

उगवला सूर्य, मावळला शशी ...
__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी

__ची आरास, सर्वांना पडली पसंत...
__रावांमुळे फुलला, जीवनी वसंत

__च्या दिवशी दरवळे, वाळ्याचे अत्तर...
__रावांचे नाव घ्यायला, मी नेहमीच तत्पर

__पुढे मांडले, प्रसादाचे ताट...
__मुळे मिळाली माझ्या, आयुष्याला वाट

__पुढे ठेवल्या, फुलांच्या राशी...
__रावांचे नाव घेते, __ च्या दिवशी

__च्या समोर, ठेवले केशरी पेढे...
__रावांचे नाव घ्यायला, कसले हो आढे-वेढे ?

__च्या पुढे, फुलांचे सडे...
__रावांचे नाव घ्यायला, मी नेहमी पुढे!

__पुढे लावली, समईची जोडी...
__ मुळे आली, आयुष्याला गोडी

__ची पूजा, मनोभावे करते...
__रावांसाठी, दीर्घायुष्य मागते

__समोर ठेवल्या, पंचपक्वान्नाच्या राशी ...
__ रावांचे नाव घेते, __च्या दिवशी

आला आला __चा, सण हा मोठा...
__राव असताना, नाही आनंदाला तोटा

मोत्यांची माळ, सोन्याचा साज...
__ रावांचे नाव घेते, __ आहे आज

सासरची मंडळी, आहेत खूपच हौशी...
__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी

 हिरवागार दुर्वा रानोमाळी उगवला
***च्या साठी मंगळागौर जागवल्या

सौभाग्याची जीवन ज्योत प्रीत तेलाने ठेवते
****च दीर्घायुष मंगळागौरीला मागते

सत्यवान सावित्री ची जोडी, विश्व विख्यात ठरली,
******** साठी आज, वटपूजेला निघाली,

शिवासाठी पार्वतीने, तपस्या उग्र केली,
***** मात्र मला , पाहताक्षणी पसंती दिली,

Top Collection of Marathi Ukhane For Pooja After Marriage 

शिव-पार्वतीच्या सारीपाट, जसा उत्तोरोतर रंगला,
तसाच ******* चा रंगेल, संसार खूप चांगला,

शिव प्राप्तीसाठी पार्वतीने, कठोर वर्त केले,
पूर्वपुण्याइने ***** मला, पती म्हणून लाभले,

वाती विना पणती,ज्योती विना वाट खुलून दिसत नाही,
********* रावाशिवाय मला, मुळीच कर्मात नाही,

वटसावित्रीच्या जागरणाला, जोशात रंग भरला,
*****ची आठवण होताच, जीव माझा व्याकुळला,

लागलाय श्रावण कर्ते मी महादेवाची महोभावे पुजा,
......... च्या जीवावर कर्ते मी मजा.

महाराष्ट्राची  परंपरा  मंगळागौरीचा खेळ
***नाव घेते झाली पहाटेची वेळ

मंगळागौरीच्या जागरण, झिम्मा-फुगाडीने रंगले,
***** च्या सुखासाठी, मंगलागौर पुजते,,,

भिल्नीच्या रुपात शंकरापुढे आली गिरजा
***च्या सौभाग्यासाठी केली मंगळागौरीची पूजा

भारतमातेच्या पूजेला स्वदेशप्रेमाची पत्री
***रावांच नाव घेते मंगळागौरीच्या रात्री

भाद्रपदेच्या तृतीयाला हरतालिका पुजते,
****** च्या सुखी संसाराचे, वरदान पार्वतीकडे मागते,

पावसाच्या आगमनाने प्रसन्न झाली धरती
***चे नाव घेते मंगळागौरीची राती

पहिल्या वर्षी वटपूजा, थाटामाटात केली,
रूप पाहून माझे,***** स्वारी खुश झाली,

नेवेद्याने चांदीचे ताट, रांगोळीने खुलले,
******* च्या संसारात, भाग्य माझे फुलले,

दारावर लावले लोकरीचे तोरण
***चे नाव घेते' मंगळागौरीचे कारण'

झिम्मा खेळून फुगडी घालून, खूप बाई दमले,
जागरण संपताच मन, ****** कडे धावू लागले,
Marathi Ukhane For Pooja
चौरंगावर हरतालिकेची, पूजा रेखीव मांडली,
पाहताच ****** नि पाटीवर, शाबासकी दिली,


चांदीच्या ताटात ठेवेले पेढे
***चे नाव घेते मंगळागौरीच्या पुढे

घरात भरल्या अठरा धनाच्या राशी
***च नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी

केळीच्या पानांनी, सप्तरंगी फुलांनी, मंगलागौर सजली,
****** च्या संसारात, ******* धन्य झाली...

कुबेराच्या घरी सोन्या चांदीच्या राशी
***नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी

उत्तररात्री शिव-पार्वती, कैलासाला निघतील,
******* च्या सौख्याचे, वरदान मला देतील,

आंब्याच्या वनात' कोकिळेचे गुंजन
***चे नाव घेऊन' करते मी मंगळागौरीचे पूजन

अंबाबाई च्या देवळात हळदी कुंकुवाच्या राशी
xxxxxx स्वानंद रावांचा नाव घेते मंगळागौरी च्या दिवशी"

अंगणी रांगोळी, दरी पणती, आकाश कंदील शोभला,
भाग्य माझे थोर म्हणून, ******* सारखा साथी लाभला,

****** ला तेल लावून, कंबर माझी मोडली,
पाडव्याची पाहताच ओवाळणी, कळी माझी खुलती, 

मांडवाच्या दारी केळीचे तोरण
***नाव घेते मंगळागौरीचे कारण  

विवेकानंदाचे स्मरक कन्याकुमारीच्या सीमेवर
***चे नाव घेते मंगळागौरीच्या वेळेवर

पौर्णिमेला आज, वटपूजा मांडू दे,
****** पती म्हणून सप्तपदी लाभू दे,

दिन दुबळ्याचे गहाणे परमेश्वराने ऐकावे
........ रावानं सारखे पती मिळाले आणखी काय मागावे

सुंदर माझे घर त्यात ........ रावांचा मधुर स्वर
दोघे मिळून फुलवतोय संसाराचा भरभरुन बहर.

सत्यावनासाठी सवित्रिने यमाचा पुरविला पिच्छा,
सात जन्म ........ राव माझे पति राहो हीच माझी इच्छा.

खाण तशी माती ........ राव माझे पती
आणि मी त्यांची सौभाग्यवती

गुलाबाचे फुल मधोमध असते पिवळे,
........ राव दिसतात कृष्णा सारखे सावळे

येत होती जात होती, घडाळ्यात पाहत होती,
घडाळ्यात वाजले एक ........ रावांचे नाव घेते ........ ची लेक.

साजुक तुपाच्या करते पुरया, टाकते पाट करते ताट
........ राव बसले जेवायला समया लावते तिनशे साठ

कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साज,
........ रावांचे नाव घेते, वटपोर्णिमा आहे आज.

लाल मणि तोडले काळे मणि जोडले
........ रावांनसाठी आई वडिल सोडले

पीडयावर पीडे पाच पिडे
........ रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांच्या पुडे

ताटभर दगिन्यांपेक्षा माणस असावी घरभर,
........ रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा जन्मभर

काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत,
........ राव गेले कामाला म्हणून मला नाही करमत

रंगीत कपाटात जापानी बाहुली,
........ रावांना जन्म देणारी धन्य ती माउली

मुबई ते पुणे पेरला होता लसून,
........ राव गेले थकून, आणा त्यांना पालाखित बसून.

खोक्यात खोका टिव्ही चा खोका,
गप्प बसा नाहीतर देईन ठोसा

सर्व सणामध्ये दिवाळीचा सण मोठा,
........ रावांच्या संसारात आनंदाला नाही तोटा

घराला असावे अंगण, अंगणात डोलावी तुळस,
........ रावांच्या आयुष्यात चढवीन आनंदाचा कळस

केळीच्या पानांवर कोवळं कोवळे ऊन,
........ रावांचे नाव घेते ........ ची सून.

कुंकू लावते लाल, त्यात पडला मोती,
........ राव माझे पति मि त्यांची सौभाग्यवती.

अंगणातल्या तुळशीला घालते पळी पळी पाणी,
आधी होते आई वडीलांची तान्ही आता झाले........ रावांची राणी

नदीला आला पूर समुद्राची झाली भरती
........ राव बसले पलंगावरती मी करते त्यांची आरती

केळी देते सोलून पेरू देते चिरून,
........ स्वामींच्या जिवावर कुंकू लावते कोरुन

परिजताकाच्या झाडा खाली हरिण घेतो विसावा,
........ रावांच्या पाठीशी सदैव परमेश्वर असावा..

तुलसी माते तुलसी माते वन्दन करते तुला,
........ रावांचे नाव घेते अखंड सौभाग्यवती राहुदे मला.

नवरात्रित लावते अखंड दिवा
........ रावांसाठी नेहमीच करत राहीन सेवा.

नवरात्रीच्या नऊ माळा, दहावी माळ म्हणजे दसरा
........ रावांचा चेहरा नेहमी असतो हसरा.

Final Note : मित्रांनो आपल्याला जर हे (Marathi Ukhane For Pooja) पूजेसाठी घेतले जाणारे मराठी उखाणे आवडले असतील तर आम्हाला कंमेंट मध्ये नक्की कालवा आणि आपल्या मित्रां सोबत जास्तीत जास्त Share करा. जर आपल्याकडे अशेच भन्नाट Marathi Ukhane for Pooja असतील तर आम्हाला नक्की लिहून पाठवा.

Share:

Friday, 10 January 2020

Comedy Marathi Ukhane List For Male & Female

55+ Comedy Marathi Ukhane for Bride & Groom

आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत विनोदी मराठी उखाण्यांचा / Comedy Marathi Ukhane  अस्सल कलेकशन. हे विनोदी Comedy Marathi Ukhane नवरदेव व नवरीमुली दोघांसाठी आहेत. आपण आपल्याला आवडेल असा सुंदर व विनोदी Comedy Marathi Ukhane लक्ष्यात ठेवायचा आणि आपल्या लग्नात घेऊन सर्वांना पोट दुःखोस्तर हसायला भाग पडायचा. 

comedy marathi ukhane
 😂  Comedy Marathi Ukhane  😂 

गुलाबाचे फूल #वाऱ्यावर लागते डुलू,
दिवसभर सुरु #असते __ चे गुलूगुलू.  😂                             

गरम गरम #भाजीबरोबर, नरम नरम पाव…
__राव आहेत# बरे, पण खातात खूपच भाव! 😂

डाळित डाळ #तुरिचि डाळ
हिच्या मांडिवर# खेळविन एका वरशात बाळ😂

बायकोपेक्षा बाकी# पोरी, वाटतात गोड गोड…
___ रावांना डोळे #मारण्याची, फार जूनी खोड.😂

एक होति चिउ एक# होता काउ
....... रावान्चे नाव #घेते दोके नका खाउ😂

हिरव्या हिरव्या# साडीला, भरजरी काठ…
__रावांच्या# खोड्या सुरु, जरा वळली की पाठ😂

गोव्यावरून #आणले, खास फेणी आणि काजू…
__चा पापा# घ्यायला, मी कशाला लाजू.😂

आकाशात #उडतोय पक्शान्चा थवा
--चे नाव# घ्यायला उखाणा कशाला हवा

पेरु खाते #चिरुन संत्री खाते सोलुन केळीची काढते साल
-- रावाच्या# नावाचे कुंकु लावते लाल

बाजारातून #घेऊन येतो __ ताजी ताजी…
__शी गुलूगुलू# करायला, मी नेहमीच राजी😂

हँगओव्हर उतरवायला,# उपयोगी पडते लिंबू …
___ एवढी हॉट# असताना, ऑफिस मध्ये कशाला थांबू😂


खोक्यात खोका टिविचा #खोका, मी त्यांची मांजर् तो माझा बोका.

Comedy Marathi Ukhane List For Wedding | लग्नातील विनोदी मराठी उखाणे.

 

उखाणा घ्या म्हटलं की, #उखाणा काही सुचत नाही
कोणाकोणाचं नाव घेऊ, #माझंच मला कळत नाही

लिपस्टिक वाढवते ___ची #ब्यूटी…😂
त्याची टेस्ट घेणं, ही माझी #आवडती डयुटी

काचेच्या# ग्लासात कोकम सरबत
....रावांशिवाय #मला नाही करमत

मटणाचा केला #रस्सा, चिकन केले फ्राय…
__ भाव देत नाही,# कित्ती केले ट्राय

चांदीच्या ताटात __चे #पेढे...
__माझे हुशार, बाकी #सगळे वेडे!😂

Also Read : Marathi Ukhane for Male 

शंकराच्या #पिंडींवर् नागोबाचा वेढा, हि माझी म्हैस आणि मी हिचा रेडा

तांदुळ #निवडत बसले होते दारात
तांदुळ निवडत #बसले होते दारात
ते #पादले दारात नि वास आला घारात😂

__व माझी #Lovestory एकदम सच्ची...
गुलूगुलू# करायला, गाठतो आम्ही गच्ची😂

चहा गरम# राहावा म्हणून कपावर ठेवली बशी…
__माझी #गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी


नव्या कोऱ्या रुळांवर, ट्रेन #धावते एकदम फास्ट…
चल ___ पिक्चरला, सीट #पकडू लास्ट.

__ची बाटली आणि काचेचे #ग्लास …
__ सोबत असताना,# क्वार्टर होते लगेच खल्लास

काय बाई सांगू, #कसं ग सांगू, मलाच माझी वाटे लाज…
__नी वजन #काटा मोडलाय आज

डास चावला की, #येते अंगाला खाज...😂
__चे नाव घेतो, #तुमच्यासाठी आज

चांदीच्या #करंड्यात, ठेवले हळदी कुंकू...
__रावांना #पाहताच, कुत्री लागतात भुंकू

शंकराच्या #पिंडीला नागाचा वेढा…
__ माझी #म्हैस आणि मी तिचा रेडा😂

गमतीदार व मजेशीर मराठी कॉमेडी उखाणे


एवढा# मोठा वाडा , वाडया समोर विहिर , विहिरीत होता कोनडा , कोनाडयात होती कोरी पाटी , पाटीत #काळी माती , मातीत #पेरले गहु , गव्हाला टाकलं पाणी , म्हणुन फुटले कोंब , कोंब दिसतात हिरवे पण काढायला# कशी जाऊ , माझ लग्नच अजुन झालं नाही तर नाव कुणाच घेऊ .

सन्डासाच्या पायारीवर टमरेल #ठेवते वाकून,
.....रावाना आली जोरदार# म्हणून मी ठेवते दाबून्

नाव घ्या नाव घ्या# नावाची काय बिशाद
.........तर आहेत# माझ्या डाव्या खिशात

पुरणपोळीत तुप #असावे ताजे अन् साजुक,
.... आहेत #आमचे फार नाजुक.😂

भल्या पहाटे# करावी देवाची पुजा ,
...च्या #जीवावर करते मी मजा

नुकताच# सचीन आलाय सेंचुरी टाकून..
नुकताच सचीन आलाय# सेंचुरी टाकून...आन्
बाबऊरावांचं नाव घेते #चार गडी राखून!!!

हरे हरे भिंत पे #बैठी एक पाल
हरे हरे# भिंत पे बैठी एक पाल
ईकबाल मेरा #टकल्या,
उसके सर पे नही बाल.

बागेत बाग #राणीचा बाग...
बागेत बाग #राणीचा बाग...
अन् रावांचा #राग म्हणजे धगधगणारी आग!

केऴिच पान #टर टर फाटत ...रावानच नाव घ्यायला मला कसतरिच् वाटत.

चान्दिच्या #ताटात फणसाचे गरे ,
....राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे

अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका,
नाव घ्यायला सान्गु नका मि आहे कुमारिका

भातुकलीचा #खेल मांडला चुल आणि बोळक्यात
...च नाव घेतो# मुर्खांच्या किंवा मित्रांच्या घोळक्यात

#1 बोटल #2 ग्लास ...राव् आमचे फस्ट क्लास्

रनवे वर #प्लेन धावतात फास्ट,
--इज माय# फस्ट आणि लास्ट

लग्नात्त #लागतात हार आणि तुरे
.... च्या नाव#घेण्याचा आगृह् आता पुरे
सासर्याच्या# मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.

टोपर्यावर# टोपर रावाचे टोपर
माझ्याच नशिबात होते हे भैताड झापड.

ऍश्वर्या-अभिषेक यांची छान जमली #जोडी, ईशा देओलने मारली यांच्याही पुढे उडी,
ईशा देओल उडी मारत पडल खड़्यात,#ऍश-अभी अडकले नवरा-बायकोच्या नात्यात, नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा,
.............रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा

ठाण्याच्या मैदाणात ख़ेळत् होतो #क्रिकेट, बघितल तिला आणि पड्ला माझा विकेट.

महादेवाच्या पिडिंवर# बटाट्याची फोड्,
.......रावांना डोळे #मारण्याची लई खोड्.

अटक मट्क #चांदणी चट्क,
.... ला म्हणा #जळ्गांव मध्य़ै भटक

गच्चीवर गच्ची# सिमेंटची गच्ची,
... माझी #बायको आहे मोठी लुच्ची

Funny & Comedy Marathi Ukhane For Marriage Ceremony  


इंद्रधनुचे #असतात सात रंग,
वर-वधुही #सप्तपदीत असतात दंग.

 नाव घ्या #नाव घ्या करु नका गजर,
.......रावांचं #नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर

कपावर कप #कपाखालि बशि,
माझी बायको #उवर्शी बाकी सगळ्या म्ह्शी

सुगंधात सुगंधी# असतो जसा केवडा...
सुगंधात सुगंधी असतो जसा केवडा......
बेवड्यांमध्ये तसा# आमचा बाबूराव बेवडा!!!!

निळ्याभोर# आकाशात विमान चालले फास्ट,
....रावांचे नाव #घेते तुमच्यासाठी खास.

जुईचि वेणी# जाईचा गजरा,
आमच्य़ा दोघां #वरति सगळ्य़ा च्य़ा नज्ररा..

मुंबई ते पुणे #१५०कि.मी. आहे अंतर,
-- हयांचं नाव #घेते, घास भरवते नंतर.

चान्दिच्या# ताटाला चन्दनाचा वेढा,
मी आहे# म्हैस तर तो आहे रेडा.

 काचेच्या#बशित बदामचा हलवा,
.......रावाचे नाव घेते #सासुबाईंना बोलवा.

चांदीच्या ताटात #मुठभर गहू,
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ.

ह्या दाराच #कुत्र त्या दारी भुंकत,
... ला पाहून #माझ डोक दुखत. 

श्रावणात #पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
.... ना आवडतो #गरम गरम बटाटेवडा.

इराण्याच्या चहा #बरोबर मिळतो मस्का पाव,
------ रावांची बाहेर #किती लफडी ते विचारू नका राव !!

कॉरव-पांडव युध्दात #अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
...... आहेत फार निस्वार्थी.

साठ्यानंची बीस्कीटे, #बेडेकरंचा मसाला,
--- नाव घ्यायला आग्रह कशाला.

सचीनच्या बॅट ला करते #नमस्कार वाकून,
***** रावांचे नाव #घेते पाच गडी राखून.  

आजघर माजघर #माजघराला नाही दार.
........च्या घरात# मात्र विंडोज दोन हजार,

मोबाईल वर एफ़ #एम् एकते कानात हेडफोन टाकुन ......
मोबाईल वर एफ़ #एम् एकते कानात हेडफोन टाकुन ......
आणि ....... रावना #मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून.. 

झेन्डुचे फुल हल्ते #डुलु डुलु,
आमचे हे दिसतात जसे डुकराचे पिलु

कपात दुध #दुधावर साय,
------ च नाव घेते ----ची माय.

एक होति परि .....
नाव घेते आता जावा आपापल्या घरि.

काचेच्या # ग्लासात कोकम सरबत,
....रावांशिवाय मला नाही करमत.

खोक्यात #खोका टिविचा खोका, मी त्यांची मांजर् तो माझा बोका.

बंगलौर#.म्हैसूर,#उटी म्हणशील तिथे जाऊ,.
घास घालतो .........बोट नको चाउस.

आकाशात उडतोय #पक्शान्चा थवा,
--चे नाव घ्यायला #उखाणा कशाला हवा.

एक होति चिउ एक होता काउ,
....... रावान्चे नाव घेते दोके नका खाउ.

डाळित डाळ #तुरिचि डाळ,
हिच्या मांडिवर खेळविन एका वरशात बाळ.

एक किलो गहु# वर एक किलो गहु,
लग्नच नहि झाल तर नाव कोनाच घेउ.

धनत्रयोदशीला #करतात धनाची पुजा,
..... च्या जीवावर करते मी मजा.

अत्ततराचि बाट्ली# कचकन फुट्ली,
.....नाव घ्यायला लाज नाही वाट्ली.

घास घ्यायला तयार #आहे -------- लेक्
मोठा आ करते ---- तु दुरुन फेक.

घरात माजघर, माजघरात मापटे,मापट्यात होते गहू, लग्न नाहि झाले तर नाव कसे घेऊ?

चांदीच्या परातित केशराचे पेढे.........आमचे हे सोडुन सगळे वेडे

नाहि नाही म्हणता म्हणता झाल्या भरपुर चुका,
.....चे नाव घेतो द्या सगळयाजणी एक एक मुका.

मुंबापुरची मुंबादेवी आज मल पावली,
श्रीखंडाचा घास देताना .... मला चावली.

इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
... घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!

केलेीच पान चुरुचुरु फाटत ...
....रावाच नाव घेताना कस कस वाटत.

एक बाटली दोन ग्लास,
माझी बायको फर्स्ट क्लास.

अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड
------ हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्.

सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे,
..... ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे.

मितालि बिल्डींग, #तिसरा मजला, #घर न - #११, घराला लावलि घंटी,
.......... माझी बबली# आणि मी तिचा बंटी.

साखरेचे पोते सुई ने# उसवले,
.....ने मला पावडर# लाऊन फसवले.

साबुदाण्याच्या #खिचडित टाकली मिरची पिकली,
माझे राव आहेत #अनपड आणि मीच आहे शिकली.

अंतिम टीप : मित्रांनो आम्हाला खात्री आहे कि आपण हे विनोदी Marathi Comedy Ukhane वाचून नक्कीच पोट भरून हसला असचाल. जर आपल्याला हे विनोदी मराठी उखाणे आवडले असतील तर ते तुम्ही आपल्या मित्रांसोबत आठवणीने Share करा आणि आपल्या कडे सुद्धा असेच भन्नाट विनोदी Comedy Marathi Ukhane असतील तर ते आम्हाला Comment द्वारे नक्की लिहून कळवा.

Share:

Friday, 3 January 2020

130+ Marathi Ukhane For Female | नवरीसाठी मराठी उखाणे

Top List of Marathi Ukhane for Female | नवरी मुली साठी अस्सल मराठी उखाणे 

महाराष्ट्रीयन लग्न पद्धती मध्ये नवरा- नवरी ने उखाणे ( Marathi Ukhane for Female ) घ्याची खूप जुनी पद्धत आहे. लग्नातली हि Ukhane घ्याची परंपरा आज पण चालत आलेली आहे. प्रत्येक नवरा- नवरी ला आपापल्या लग्ना मध्ये मराठी उखाणे / Marathi Ukhane घ्यावेच लागतात. 

marathi ukhane for female
Marathi Ukhane for Female 
आज आम्ही नवरी मुली साठी खास मराठी उखाणे / Marathi Ukhane for Female घेऊन आलो आहोत. नवरी मुली ला उखाणे तयार करत बसण्याची काहीच गरज नाही आहे. नवरी मुली ने ह्या Marathi Ukhane for Female मधील कोणते हि उखाणे लक्ष्यात ठेवावे व आपल्या लग्ना दिवशी नवऱ्या साठी घ्यावे. हे मराठी उखाणे ( Marathi Ukhane for Female ) पाठ करायला देखील खूप सोप्पे आहेत.

marathi ukhane for female
marathi ukhane for female 

Ukhane in Marathi for Female Marriage | नवरीसाठी लग्नात घ्याचे मराठी उखाणे   

दारापुढे काढली, सुंदर रांगोळी फुलांची
__च नाव घेते, सून मी __ची

मोगऱ्याचा सुगंध, पावसाळ्यातील मृदगंध…
__शी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध

आई बाबांनी केले लाड, सासू सासऱ्यांनी पुरवली हौस ...
__च नाव घ्यायला, मला येते फारच मौज

विद्येचा नसावा अभिमान, श्रीमंतीचा नसावा गर्व...
__ रावांच नाव घेते, ऐकताय ना सर्व?

महालक्ष्मी च्या देवळाला, सोन्याचा कळस...
__रावांचे नाव घ्यायला, मला नाही आळस

सूर्याच्या किरणांनी, उगवली पहाट...
__रावांमुळे झाली, सुखकर प्रत्येक वाट

आशीर्वादाची फुले, वेचावीत वाकून...
__रावांचे नाव घेते, तुमचा मान राखून

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात...
__ राव भरले, माझ्या मनात

साजूक तुपात, नाजूक चमचा...
__रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा

मंगळसूत्रातील दोन वाटया, सासर आणि माहेर…
_________रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.

प्रेमाच्या छायेत, आयुष्य घेते विसावा...
__रावांचे नाव घेते, आपला आशीर्वाद असावा

नाजूक अनारसा, साजूक तुपात तळावा ...
__ रावांसारखा पती, जन्मोजन्मी मिळावा

प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी, सौख्य मी विणले...
__रावांच्या साथीने, जीवनपुष्प बहरले

कळी हसली, फूल फुलले, मोहरून आला सुगंध...
__रावांमुळे जीवनात, बहरून आलाय आनंद

यमुनेच्या काठी, ताजमहाल प्रेमाचा...
__रावांचे नाव घेते, मान राखून सर्वांचा

आकाशात शोभतो, इंद्रधनुष्याच्या पट्टा...
__रावांचे नाव घेते, पुरे आता थट्टा

गीतात जसा भाव, फुलांत जसा सुगंध...
__रावांमुळे मिळाला, मला भरभरून आनंद

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने...
__रावांचे नाव घेते, पत्नी या नात्याने

गुलाबाच्या फुलांपेक्षा, नाजूक दिसते शेवंती...
__रावांना मिळो दीर्घायुष्य, हीच देवाला विनंती

चांदीच्या किचन मध्ये, सोन्याचा ओटा...
__सोबत असताना, नाही आनंदाला तोटा

स्वप्नातला राजकुमार, आला घोड्यावर बसून...
__रावांचे नाव घेते, त्यांच्याच बाजूला बसून

 Romantic Marathi Ukhane for Female 


जंगलात जंगल, ताडोबाचं जंगल...
__रावांच्या संसारात, सर्व राहो कुशल-मंगल

देवळावर चढवला, कळस सोन्याचा...
__राव म्हणजे, नवरा माझा नवसाचा

मोगऱ्याचा गजरा, गुलाबाचा हार...
__रावांच्या रूपात भेटला, मला उत्तम जोडीदार

सौख्याच्या वाऱ्यासंगे, आनंद मेघ आले...
__रावांच्या संसारात, मी अमृतात न्हाले

विठ्ठलाच्या च्या दर्शनाला लागतात, लांबच लांब रांगा...
_________रावांचे नाव घ्यायला, मला कधीही सांगा...

ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,
… रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल.

कण्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर,
… रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर,

शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकुन,
… रावांचे नांव घेते, सर्वांचा मान राखुन,

लावित होते कुंकु, त्यात पडला मोती,
…रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती,

“दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,
…चे नाव घेते तुमच्या साठी!”

नांदा सौख्यभरे दिला सर्वांनी आशीर्वाद,
…रावांचे नाव घेते दया सत्यनारायणाचा प्रसाद!

पार्वती ने पन केला महादेवालाच वरीन,
…रावांच्या साथीन, आदर्श संसार करीन.

गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी,
…रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.

मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर,
…रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर.

आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हा विष्णु आणि महेश,
…रावांच नाव घेते आणि करते मी गृहप्रवेश.

प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतिची वात,
…रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात.

नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी,
…रावां सोबत आली मी सासरी.

गुलाबाच्या झाडाला फूल येतात दाट,
…रावांचे नाव घेते सोड़ा माझी वाट.

शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी,
........ रावांच नाव घेते तांदूळ घेऊन हाथी.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
....… रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने.

राज हंस पक्षी शोभा देतो वनाला,
… रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला,

लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा,
… रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा.

सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान,
… रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान.

पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,
… रावांच्या नावाने घालते मंगल सुत्रांचा हार.

आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे,
… राव हेच माझे अलंकार खरे.

पूजेच्या साहीत्यात, उदबत्तीचा पुडा,
… रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा.

अभिमान नाही संपत्तीचा, सर्व नाही रुपाचा,
… रावाना घास घालते वरण-भात-तुपाचा,

यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली,
… रावांची जन्मदाती, धन्य ती माऊली,

श्री विष्णुचा मस्तकावर सदैव असतो शेष,
… रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश.

मंदिरात वाहाते, फुल आणि पान,
… रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान.

छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन,
… रावांचे नांव घेते, ऐका सारे जण.

गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशा,
.. रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवसी.

marathi ukhane for female
marathi ukhane for female  


माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने,
.. रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे.

कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा,
… रावांचे नांव घेते, सारे जण बसा.

रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा,
… रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.

खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
… रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.

पतीव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते,
… रावांचे नांव घेतांना, आशीर्वाद मागते.

अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस,
… रावांच नांव घेतांना, कसला आला आळस.

संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,
… रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला,

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
… रावांच नाव घेते निट लक्ष ठेवा.

कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती,
…रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती.

 Unique List of Romantic Marathi Ukhane for Female 


सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात,
… रावांचे नांव घेते, …च्या घरात.

मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती,
...… रावांचे नांव घेऊन करने इच्छापूर्ती.

डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,
.. रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.

अंगणात होती मेथी, पाणी घालु किती,
… रावांच्या हातात सत्यनारायनाची पोथी.

हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी.
… रावांचे नांव घेते… च्या दिवशी.

वेळेचे काळचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस,
…रावांचे नांव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस,

शरदाचे संपले अस्तीत्व, वसंताची लागली चाहूल,
…रावांच्या संसारात टाकते पहीले पाऊल.

गृह कामाचे शिक्षण देते माता,
…रावांचे नांव घेते तुमच्या आग्रहाकरीता.

दीन दुबळ्यांचे गाहाने परमेश्वरानी ऐकावे,
… रावा सारखे पत्ती मिळाले आणखी काय मागावे.

केसात माळते रोज, मी गुलाबाचे फुल,
… राव माफ करतात माझी प्रत्येक भुल.

तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेल ही शिंपडले,
…रावांचे मन, मी केव्हाच जिंकले.

पोर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल,
…रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल.

Also Read : Marathi Ukhane for Male

…रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा,
त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा.

स्वातंत्र्याच्या होमकुंडात विरांनी घेतली उडी,
…रावाच्या नावाने घालते गळ्यात मंगळ सुत्राची जोडी.

नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे,
…रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे.

चंदेरी सागरात, रुपेरी लाटा,
… रांवाच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.

पषातील धुंद वारा छेडीतो, माझ्या अंगाला,
… रावांचे नांव घेते सुर्यनारायनाच्या साझीला.

चंद्राचा झाला उद्य अन् समुद्राला आली भरती,
…रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती.

नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार,
… रावांचा स्वभाव आहे फारच उदार.

करवंदाची साल चंदनाचे खोड,
… रावांचे बोलने अमृतापेक्षा गोड.

सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले,
… रावांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले.

वसंतातली डाळ पन्ह, देती थंडावा
…रावांसह मला आपला आशीर्वाद हवा.

मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले,
… रावांचे हेच रुप मला फार आवडले,

आज सारे सुख माझ्या दारी दाटले,
…रावांचा प्रेम अजुन तरी नाही आटले.

मला गुणवान पती मिळाले, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा,
…राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा.

सासरी आहे माझ्या सुंदर हिरवा मळा,
…रावामुळेच लागला मला त्याचा लळा.

शिक्षणाने विकसीत होते, संस्कारीत जीवन,
…रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन.

इंद्र धनुष्यात असतात सप्तरंग,
…रावांच्या संसारात मी आहे हंग.

निळ्या नभात चंद्राचा प्रकाश,
…रावांवर आहे माझा विश्वास.

प्रेमाचे कच्चे धागे खेचती मागे पुढे,
…रावांच्या साथी साठी माहेर सोडावे लागे.

प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची,
…रावांच्या साथीने सुरवात करते सहजीवनाची.

मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध…
___ सोबत मला मिळाला, जीवनाचा आनंद !

दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या गाठी…
__ रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी

सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही …
__ रावांचे नाव हळूच ओठी येई

सोन्याची अंगठी चांदीचं पैंजण…
__ रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण

चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा …
___रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा

संसाराच्या सागरात प्रेमाची होडी...
__रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी

आग्रहाखातर नाव घेते, आशीर्वाद द्यावा,
____ रावांचा सहवास आयुष्यभर लाभावा.

हिरव्या हिरव्या साडीचा पिवळा काठ जरतारी…
__ रावांचे नाव घेताच येई चेहऱ्यावर तरतरी

पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी…
__मुळे आली माझ्या आयुष्याला गोडी

आतून मऊ पण बाहेर काटेरी साल
___दिसले खडूस तरी, मन मात्र विशाल

सासरची छाया, माहेरची माया...
__आहेत, माझे सर्व हट्ट पुरवाया

आई ने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम...
__सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम

हिरवा शालू लेवुनि येतो श्रावण महिना,
.... हाच माझा खरा दगिना.

जाईच्या वेलीला आलाय बहार,
..... ना घातला २७ फेब्रुवारीला माझ्या गळ्यात हार.

सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले.....रावाचे नाव घेउन मी सौभाग्यवति झाले.

भाग्याचे कुन्कु प्रेमाचा आहेर ,
.........रावांच्या मिठित विसरते मी माहेर.

काव्य आनि कविता सागर आणि सरिता
..........चे नाव घेते तुमच्या करिता.

हिमालाय पर्वतावरा बर्फाच्या राशी,
........चे नाव घेते लग्नाच्या दिवशी.

 New & Latest Marathi Ukhane for Female for Wedding Ceremony 


नागपंचमीला घरोघरी होते पुरणपोऴी,
.....नी आणली माझ्याकरिता कटकीची चोऴी.

अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड,
........ हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्.

गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर,
............. च्या हातात हात देउन झाले मी निर्भर..

हंसराज पक्षी आकाशात दिसतात हौशी,
.....रावाचे नव घेते सत्यनारायनाच्या दिवशी.

साँजवात लावताना येते माहेरची आठवण ,
..........रावांसाठी झाली सासरी पाठवण.

वसंत ऋतुत कोकीळा गाती गोड,
.....गेले गावाला तर त्यांच्या येण्याची लागते ओढ.

सखोल विचार आणि कठीण परीश्रमाला असावी प्रामाणिकपणाची जोड,
...........चे बोलणे आहे साखरेपेक्षा गोड.

सौभाग्य काक्षिणीने डोक्यात माळावा गजरा,
..... चे नाव घेते आज आहे दसरा.

पनिपुरि खाताना लागतो जोरदार ठसका,
...... ला आवडते बिस्कित ब्रितानिया मस्का - चस्का.

नान्दा सौख्य्भरे दिला सगल्यानि आशिरवाद्,
.....चे नाव घेते द्या सत्यनारायनाचा प्रसाद्.

पुण्यात औन्ध मधे बन्गला उभा आहे ऐटित ,
जळू नका लोकहो माझे ........ राव आहे आय़् टीत.

आम कि डाली पर गाये कोयलिया,
.........के संग बिते सारी उमरिया.

संतांच्या वाणीत आहे सोनियांच्या (ज्ञानाच्या) खाणी,
.... ......आहेत माझे कुंकूवाचे धनी.

हरतालिकेला सुहासिनी करतात महादेवाची पुजा,
..... च्या सहवासात खरी माझी मजा.

संकेताच्या मीलनाकरीता नयन माझे आतुरले,
...........ची मी आज सौभाग्यवती झाले.

राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याच,
..... च नाव घेते अशिर्वाद द्यावा सौभाग्याचा.

कपाळावर लावले कूंकू लाल लाल,
....... च्या जीवावर आहे मालीमाल.

Also Read : Comedy Marathi Ukhane for Male & Female

आशा करत आहोत कि आपल्याला हे marathi ukhane for female ( नवरी मुलींसाठी उखाणे ) आवडले असतील. आपण हे marathi ukhane आपल्या मैत्रिणी बरोबर किंवा बहिणी बरोबर पण Share करू शकता. 

Share:

Monday, 30 December 2019

130+ Marathi Ukhane For Male | नवरदेवासाठी मराठी उखाणे

Best Marathi Ukhane For Male in Wedding| नवरदेवासाठी मराठी उखाणे 

marathi ukhane for male

लग्न म्हणलं कि मराठी उखाणे / Marathi Ukhane for Male आलेच. महाराष्ट्रीयन लग्न पद्धतीत Ukhane घेण्याची जुनी पद्धत आहे. नवरदेव असो कि नवरी, दोघानला पण Marathi Ukhane घ्यावाच लागतो. लोक आपापल्या लग्नात खूप छान-छान Marathi Ukhane घेतात. 

आज आम्ही नवरदेवासाठी घेऊन आलो आहोत उत्तम व नवीन मराठी उखाणे (Marathi Ukhane for Male). ह्या Marathi Ukhane for Male चा उपयोग तुम्ही आपल्या लग्नात करू शकता. हे Marathi Ukhane For Male लक्ष्यात ठेवायला खूप सोप्पे आहेत, त्यामुळे तुमच्या लक्ष्यात ते पटकन राहतील आणि लग्नात तुम्ही झटकन मराठी उखाणे घेऊ शकता.

 Best Collection of Marathi Ukhane For Male

भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी,
_______ची आणि माझी, लाखात एक जोडी

कृष्णाचे नाव, सारखे माझ्या मुखी,
______ला ठेविन, आयुष्यभर सुखी.

 माझ्याशी लग्न करायला ______ झाली राजी,
 केल मी लग्न, _________ झाली माझी .

खिशात माझ्या प्रेमाची लेखणी,
______माझी, सगळ्यात देखणी.

प्रेमाच्या पाण्याचा घेतला मी घोट,
______ च नाव घेतील माझे हे ओठ.

सुर्याच्या किरणांचा प्रकाश पडला लख्ख,
माझ्या वर ________चा, पुर्णपणे हक्क.

प्रेमाच्या राणात नाचतो मोर,
_____शी केल लग्न, नशीब माझ थोर.

कृष्णाला बघून राधा हसली,
____माझ्या ह्रदयात बसली.

गोड मधुर आवाज करी कृष्णाची बासरी,
_____ला घेऊन जातो मी तीच्या सासरी.

प्रेमाची कविता, प्रेमाचे लेक....
_________माझी लाखात एक.

 ऊस आहे गोड, बर्फ आहे थंड,
____समोर माझ्या, सोण पण लोखंड

छोटीशी तुळस, घराच्या दारी,
तूमची ............. , माझी जबाबदारी.

सुर्योदयाचे सुंदर आहे दृश्य,
........... आली जिवनात, सुंदर झाले आयुष्य.

2 अधिक 2  होतात चार,
_____ बरोबर करीन सुखी संसार.
रूप तिच गोड, नजर तिची पारखी,
शोधूनही सापडणार नाही ........ सारखी.

शोभून दिसतो झेंडा, डोंगरा वरती
मी आहे शंकर,  .............. माझी पार्वती

सुंदर झाडावर, कोकीळा गाणी गाती,
........ च्या सुख दुखात मी तीचा साती.

सुंदर झाडावर, कोकीळा गातो गाणी,
......... राहील, सदैव माझ्या मणी.

सुंदरात सुंदर,  प्रेमाचे गाव,
........... समोर लागणार,  आता माझे आडनाव.

मुलगा झाला मित्राला, नाव ठेवल बालाजी,
सुखी ठेवतो............ ला, करू नका काळजी.

Romantic Marathi Ukhane for Male in Marriage Ceremony / नवऱ्या मुलासाठी प्रेमळ मराठी उखाणे 

सुंदर समुद्राच्या, सुंदर लाटा,
माझ्या आयुष्यात, .......... चा ही वाटा.

कृष्ण भरवतो राधेला, प्रेमाचा घास,
............ च माझ ह्रदय, आणि ......... च माझा श्वास.

सिते साठी रामाणे, रावणाला मारले,
............च नाव, मी ह्रदयात कोरले.

श्री रामांसाठी, श्री हनुमान धावले,
..........च्या आयुष्यात टाकतो मंगलमयी पावले.

उंच आकाशात, पाखरांचे थवे,
........ चे नाव, कायम ओठी यावे.

सुर्योदयाचे, सुंदर ते दृश्य,
.........शिवाय अधुर माझ आयुष्य.

सोण्याचा मुकुट, जरीचा तुरा
........ माझी, कोहिनूर हिरा

दूधाची शाई, शाईच दही
....... आली आयुष्यात,  आयुष्य झाल मंगलमयी

पक्षांचा थवा, दिसतो छान
...... आली जीवनात, वाढला माझा मान

एक दिवा, दोन वाती
.......... माझी, जीवन साथी

पावसाचे पाणी, नदि मध्ये साठले
माझ्या नावाचे, काळे मणी...... ने घातले

खुपच सुंदर, दत्तांचे मुख
आज पासून, ........च माझ सुख

सुंदर दिसते, दत्तांचे मुख
........च्या सुखात, माझे सुख

एक दिवा, दोन वाती,
....... च्या  सुख दुःखात, मी तिचा साती

राधेचा चेहरा, थोडासा हासरा
....... समोर, पैसा पण कचरा

 एक दिवा, दोन वात
......... बरोबर करतो, संसारची सुरूवात

स्वरांचा सुर, सुरांची गायिकी
........ समोर माझ्या, चंद्राची काय लायकी

पोर्णिमेचा चंद्र, असतो गोल
..........समोर माझ्या, पैशाला पण नाही मोल

आकाशात आहे, चंद्राची कोर
.......शी झाले लग्न, नशीब माझे थोर

गर गर गोल, फिरतो भवरा
........च नाव घेतो, मी तिचा नवरा

Latest Marathi Ukhane List for Male / होणाऱ्या नवरदेवासाठी नवीन मराठी उखाणे 

लोकांनी आनला, प्रेमाचा आहेर
माझ्या प्रेमात ........, विसरेल तिच माहेर

स्वरांचा सुर, सुरांची गायिकी
.......समोर माझ्या, सोण्याची काय लायकी

पुल बांधला, सितेसाठी रामाने
ठेविन मी .......ला मानाने

जंगलात पसरला, चंदनाचा सुगंध
.........मुळे आयुष्यात, पसरला अंनद

राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ
......... शिवाय माझ, जीवनच वेर्थ

पुल बांधला, सितेसाठी रामाने
ठेविन मी....... ला, प्रेमाने

स्वरांचा सुर, सुरांची गायिकी
........समोर माझ्या, पैशांची काय लायकी

राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ
माझ अपूर्ण आयुष्य, ....... मुळे पूर्ण

 राम भरवतो सितेला, प्रेमाचा घास
.....च माझ जीवन, आणि.......च माझा श्वास

उसाचा पेर, लागतो गोड
माझ्या आयुष्याला मिळाली, ........ ची जोड.

कृष्णाला आहे, राधेची जोड
.............माझी, साखरे पेक्षा गोड

कृष्णाची बासरी, बासरी ची धून
माझ्यासाठी चांगला, ........... चा पाय गून

सोण्याची बरणी, भरली तूपाने
सूख आल घरात, ...............च्या रूपाने

 सोण्याची बरणी, भरली तूपाने.
लक्ष्मी   आली घरात, ........च्या रूपाने

 जंगलात पसरला, मोगर्याचा सुहास
........बरोबर करेन,  प्रेमाचा प्रवास

जय घोश होऊदे , श्री रामाच्या नावाचा
........ समोर माझ्या, स्वर्ग काय  कामाचा

कृष्ण भरवतो राधेला, प्रेमाचा घास
................च नाव घेतो ,तूमच्यासाठी खास

सोण्याचा दिवा, कापसाची वात,
आयुष्य भर देईन, ......... ची सात

फुलांच्या बागेत, वेल जुई चा
.........च नाव घेतो, मान ठेवून आई चा

सोण्याची वाटी, सोण्याच ताट
.......येण्याने आली, सूखाची लाट

सितेसाठी रामाने , रावनाला मारले
.........च्या येण्याने, जीवनच बहारले

पाण्या शिवाय झाड, जगणार नाही
............... शिवाय मला, जमणार नाही

 आंब्याच्या वनात , मोर नाचतो छान
आता......च माझा जीव, आणि ...... च माझा प्राण

आंब्याच्या वनात,  मोर नाचतो छान,
नाव घेतो .........च,ठेवून आई बाबांचा मान

सोण्याचा कप, सोण्याची बशी
....... माझ्या,  ह्रदया पशी

हिरव्या राणात, गोड ऊस
..........मुळे पडला, प्रेमाचा पाऊस

ऊन पसरले कोवळे, समुद्राच्या लाटेवर
सात देईन............... ची, आयुष्याच्या वाटेवर

 महिना होता श्रावण, पाऊस आला जोरदार
....... च्या सुख दुःखात, मी तीचा जोडीदार

घर होत खुष, बाळाच्या चाहूलांनी
सुख आल घरी,............... च्या पावलांनी

पिवळ सोण, पांढरी शुभ्र चांदी
..............ने काढली, माझ्या नावाची मेहंदी

कृष्ण मारतो राधेला, हाक गंमतीने
ईयूण पुढचा प्रवास,............च्या संगतीने

सुंदर प्रेमाचे, सुंदर गाव
...........च्या मेहंदीत, माझे नाव

अतूट असते मैत्री, नात असत घड्ड
पूर्ण करीन सगळे,.............चे हट्ट

सोण्याची बरणी, भरली तूपाने
सून आली घरात, .......... रूपाने

नवरदेवासाठी गमतीशीर मराठी उखाणे / Marathi Ukhane For Male List  

 निर्मळ मंदिर, पवित्र मूर्ती
प्रेम माझ फक्त,............वरती

  विठोबा माझा, विटेवर उभा
...........ने वाढवली, घराची शोभा

रूप गोड, नजर पारखी
...........माझी, मोत्या सारखी

रूप गोड, नजर पारखी
...........माझी, मोत्या सारखी

निळ आभाळ, कळी माती
.......... माझी, जीवन साती

सुंदर समुद्राची, सुंदर लाट
............शी बांधली, लग्नाची गाट

शेतातले धाण्य, धाण्याचे दळण
..........मुळे आले, सुखाचे वळण

सोण्याचा कप,चांदीची बशी
जोडल नात , .........शी

हिरव गार सोण, पिकवल मातीने
सुखाचा प्रवास करीन,............. च्या साथीने

मातीच्या चूली, असतात घरोघर
मरणसुध्दा आता, ............ बरोबर

जोतिबा आहे, महाराष्ट्रची शान
............ ने अणली, सुखाची खान

मातीच्या चूली, असतात घरोघर
नव्या जीवनाची सुरूवात, ......... बरोबर

रधे शिवाय, कृष्णला गमेना
......... माझी,सोण्याचा दागिना

सोण्याचा कप, सोण्याची बशी
प्रित जुळली, ............शी

पाऊस पडला शेतात, वास येतो  मातीला
आयुष्यभर साथ देईन, वचन देतो ...........ला

रूसतो श्री कृष्ण, राधेच्या जाण्याने
सुख आल घरी,............च्या  येण्याने

हिरव्या गार निसर्गाची, ताजी तवानी हवा
सुखी ठेविन ........... ला, तूम्ही निश्चिंत राहा

हिमालय पर्वतावर, बर्फाचे खडे
....... चे नाव घेतो, आई बाबांपुढे

पवित्र नदीचा, संत प्रवाह
अवडली..........., केला विवाह

अर्जूनाची युक्ती, अर्जूनाचा नेम
सदैव  करेन    , ..............वर प्रेम

“दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी
..………चे नाव घेतो, तुमच्या साठी

मैत्रि आणी नात्यात, नसावा स्वार्थ
..........मुळेच माझ्या, जीवनाला अर्थ

द्राक्षाच्या वेलीला, त्रिकोणी पान
...........चे नाव घेतो, राखतो तुमचा मान

जेजुरीचा खन्डोबा, तुळ्जापुरची भवानी
.........च नाव घेतो, ती माझी अर्धांगिनी

हरीश्रंद्र राजा, रोहिदास पुत्र
माझ्या नावाचे ......….ने, घालते मंगळसूत्र

जोतिबाच नाव, सदैव माझ्या मुखी
............... आली घरात, घर झाल सुखी

 जंगलात पसरला, चंदनाचा सुगंध
............. आली घरात, झाला आनंद

सुराविना कळला, साज संगीताचा,
........ नावात गवसला, अर्थ जीवनाचा

साजूक तुपात, नाजूक चमचा,
....... च नाव घेतो, आशीर्वाद असु दे तुमचा

जाईजुईचा वेल, पसरला दाट
....... बरोबर बांधली, जीवनाची गाठ

पिवळा पितांबर, श्रीकृष्णाच्या अंगावर घातला
....... च्या जीवनासाठी, पुरूष  जन्म घेतला

फुलाफळांना बहर आला, गोळा जाहले पक्षी
.......ची माझी जोडी, परमेश्वर साक्षी

देवाजवळ करतो, मी देवाची आरती
......माझ्या जीवनातील, महत्त्वाची व्यक्ती

काळी माती, हिरवे रान
र्हदयात माझ्या,..........स्तान

कोल्हापुरला आहे, महालक्ष्मीचा वास,
मी भरवितो …… ला, जलेबी चा घास.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने
…….च्या गळ्यात, मंगळसूत्र बांधतो प्रेमाने

दुर्वाची जुडी, वाहतो गणपतीला
……सारखी पत्नी मिळाली, आनंद झाला मला.

भाजीत भाजी, मेथीची,
……माझ्या, प्रितीची.

"आकाशात उडतोय, पक्ष्यांचा थवा,
...........चे नाव घ्यायला, उखाणा कशाला हवा!

एका वर्षात, महिने असतात बारा
......... या नावात, सामावलाय आनंद सारा!

हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी
सौ.....चे नाव घेतो अक्षता पडल्याच्या दिवशी !!!!!

संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता
साथ आहे माझ्याबरोबर ......कांता !!!!!

इंग्रजी भाषेत चहाला म्हणतात टी
सौ....चे नाव घेण्यास लागते डबल फी !!!!!

चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा
सौ.....चा आणि माझा जान्मोजन्माचा जोडा !!!!!

चांदीच्या वाटीत दहीभाताचा काला
सौ....चे नाव घेता पहिला आरंभ केला !!!!!

अंधश्रद्धेचा पाश करी स्त्रियांचा नाश
सौ....चे नाव घेतो तुमच्यासाठी खास !!!!!

सासूबाई आहेत प्रेमळ, मेहुणी आहे हौशी
सौ.....चे नाव घेताना मला होते ख़ुशी !!!!!

गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ
सौ....ने दिला मला प्रेमाचा साथ !!!!!

दवबिन्दुच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
सुखी आहे संसारात सौ..... च्या संग !!!!!

आम्रवृक्षाच्या छायेत कोकिळा करते कुजन
सौ.....सोबत करतो मी लक्ष्मीपुजन !!!!!

बकूळ फुलांचा सदा पडे अंगणी
सौ..... आहे माझी अर्धांगिनी !!!!!

देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान
सौ.....ने दिला मला पतिराजांचा मान !!!!!

जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा
सुखी संसारात सौ..... चा अर्धा वाटा !!!!!

दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
माझी आणि सौ.....ची अखंड राहो प्रीती !!!!!

वसंतात दरवळतो फुलांचा सुवास
सौ.....सोबत सुरु केला जीवनाचा प्रवास !!!!!

दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला
सौ.....सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !!!!!

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री
.....झाली आज माझी गृहमंत्री !!!!!

सितेसारखे चरित्र, रंभेसारखे रूप
.....मिळाली आहे मला अनुरूप

संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका
.....चे नाव घेतो सर्वजण ऐका !!!!!

रंभा मेनका स्वर्गलोकीच्या अप्सरा
.....चा पायगुण शकुनी खरा !!!!!

दासांचा दासबोध अनुभवाचा साठा
....चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!!!

संसारातल्या संकटांची नाही पर्वा आता
साथ आहे माझ्याबरोबर ......कांता !!!!!

चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण,
………चे नाव घेऊन सोडतो कंकण.

निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान,
…..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.

सनई चौघडा वाजतो सप्तसुरात,
…………. चे नाव घेतो……..च्या घरात.

एक होती चिऊ, एक होता काऊ,
……..चे नाव घेतो डोक नका खाऊ.

काही शब्द येतात ओठातून,
…… चं नाव येतं मात्र हृदयातून. 

कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास,
मी भरवितो …… ला जलेबी चा घास.

भाजीत भाजी शेपूची,
……माझ्या प्रितीची.

पुरणपोळीत तुप असावे साजुक,
……. आहेत आमच्या फार नाजुक.

लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
…ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.

सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप,
…………..मला मिळाली आहे अनुरूप.

गाडीत गाडी डेक्कन क्वीन,
……. आहे माझी ब्युटी क्वीन.

संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका,
……चे नाव घेतो सर्वजण ऐका.

दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला,
सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.

मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
…………….चे बरोबर बांधली जीवन गाठ.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
…….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.
Also Read : Comedy Marathi Ukhane for Male & Female

आम्हाला खात्री आहे कि आपल्याला हे नवरदेवासाठी मराठी उखाणे / Marathi Ukhane for Male नक्क आवाढले असतील. जर तुम्हाला हे आवाढले असतील तर तुम्ही हे मराठी उखाणे / Marathi Ukhane for Male आपल्या लग्न होणाऱ्या मित्राबरोबर पण Share करू शकता. कदाचित त्याला पण अश्याच मराठी उखाण्याची गरज असू शकते.  
Share:
Copyright © Marathi Ukhane About Us | Privacy Policy | Disclaimer